वडील गिरणी कामगार, अभिनेत्या मुलानं त्याचं मिलसमोर घेतलं हक्काचं घर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Vivek Sangle Home At Lalbaug : प्रसिद्ध मराठी अभिनेता विवेक सांगळेनं गिरणगावात त्याचं हक्काचं घर घेतलं आहे. त्याचे वडील ज्या मिलमध्ये काम करत होते त्याच मिलच्या समोर त्यानं हे घर घेतलं आहे.
मुंबई : लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतून सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अभिनेता विवेक सांगळे. अभिनेत्यानं चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. विवेकनं मुंबईत आणि ते ही लालबागमध्ये स्वत: चं हक्काचं नवं घर घेतलं आहे. विवेकनं नुकताच त्याच्या नव्या घरात गृहप्रवेश केला. नव्या घरातील पुजेचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलेत. विवेकनं लालबागमध्ये घर खरेदी करण्यामागे एक खास कारण आहे. जे ऐकून गिरणगावातच नाही मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला अभिमान वाटेल.
विवेक सांगळेचा जन्म आणि शिक्षण मुंबईत झालेलं आहे. त्याचं संपूर्ण बालपण मुंबईत गेलं आहे. अभ्युदय नगरमध्ये वन रुम किचनच्या घरात विवेकचं बालपण गेलं आहे. विवेकनं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर त्याच्या कष्टानं मुंबईत तीन घर घेतली. लालबागमध्ये घेतलं हे त्याचं तिसरं घर आहे. पण आधीच्या दोन घरांपेक्षा विवेकचं लालबागमधील घर खूप खास आहे. कारण या घरातून त्याच्या वडिलांची मिल दिसते.
advertisement
लोकमत फिल्मीशी बोलताना विवेक म्हणाला, "2000साली पप्पांची मिल बंद झाली होती. तेव्हा असं वारं वाहत होतं की मिल वाल्यांना घर मिळणार आहे. त्यांना तिथेच घर मिळणार आहेत जिथे त्यांनी काम केलं आहे. तेव्हाच मी ठरवलं होतं की असं घर हवं जिथून तो व्हूय आहे जिथे मिल दिसते. ज्या ठिकाणी माझ्या वडिलांनी 27-28 वर्ष काम केलं ती मिल घरातून दिसते. माझ्या घरातून बघताना माझ्या वडिलांना त्यांची मिल दिसली पाहिजे हे माझं स्वप्न होतं. ही माझ्यासाठी खूप स्पेशल मुमेंट होती."
advertisement
विवेकनं पुढे सांगितलं, "झाडू मारण्यापासून हेड फिटरपर्यंत त्यांनी काम केलं. त्यांनी इथेच राहावं अशी माझी इच्छा होती. त्यांचा जन्म मुंबईतील आहे. गेली 70 वर्ष ते इथे आहेत. आई 50 वर्षांपासून इथे आहे. आपण शूट करत असतो. घरातील 14 तास बाहेर असतो. आपण कुठेही राहू शकतो. मला काही वाटणार नाही. मला काम करून रात्री घरी जायचं आहे. पण त्यांना तिथे राहायचं आहे. पण त्यांना असं वाटायला नको की कुठे आलो आपण, आजूबाजूला कोणी नाही. 70व्या वर्षी कुठे नवीन ओळख बनवायची. माझे आई वडील इन्ट्रोवर्ड आहेत. मला त्यांना हलवायचं नव्हतं."
advertisement

"या पैशात मी बाहेर खूप मोठं घर घेऊ शकलो असतो पण लालबागमध्ये इथे राहून त्यांचे इमोशन जपणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. लालबाग किंवा साऊथ मुंबईमध्ये राहण्याची एक वाइब आहे. मी लहानपणापासून इथे राहिलोय त्यामुळे मला ती वाइफ माहितीये आणि मला ती कुठेही मिस करायची नव्हती", असंही विवेकनं सांगितलं.
advertisement
विवेक पुढे म्हणाला, "मला आई-बाबांना कुठे लांब न्यायचं नव्हतं. त्यांचे मित्र मैत्रिणी मला त्यांच्यापासून तोडायचे नव्हते. आईचं भजनी मंडळ आहेत. पप्पांचे काही मित्र आहेत. त्यांना त्यांना रोज भेटता आलं पाहिजे. कारण या वयात दुसरीकडे जाऊन ओळखी बनवणं, एडजस्ट होणं खूप कठीण होऊन जातं."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 07, 2025 9:15 AM IST






