advertisement

IPL मधला नवा 'बनी', तिलक वर्माचा पुन्हा तोच पॅटर्न, रेकॉर्ड पाहून बसेल शॉक!

Last Updated:

आयपीएलमध्ये बॅटर आणि बॉलर यांच्यात काँटे की टक्कर अनुभवायला मिळते. यंदाच्या मोसमात दिल्ली आणि मुंबईच्या सामन्यातही खेळाडूंमध्ये वैयक्तिक लढत पाहायला मिळाली.

IPL मधला नवा 'बनी', तिलक वर्माचा पुन्हा तोच पॅटर्न, रेकॉर्ड पाहून बसेल शॉक!
IPL मधला नवा 'बनी', तिलक वर्माचा पुन्हा तोच पॅटर्न, रेकॉर्ड पाहून बसेल शॉक!
नवी दिल्ली : आयपीएलमध्ये बॅटर आणि बॉलर यांच्यात काँटे की टक्कर अनुभवायला मिळते. यंदाच्या मोसमात दिल्ली आणि मुंबईच्या सामन्यातही खेळाडूंमध्ये वैयक्तिक लढत पाहायला मिळाली. या मॅचमध्ये दिल्लीचा फास्ट बॉलर मुकेश कुमार आणि मुंबईचा विस्फोटक खेळाडू तिलक वर्मा समोरासमोर आले, ज्यात मुकेश कुमार पुन्हा एकदा यशस्वी ठरला. मुकेश कुमारने ओव्हरमध्ये रियान रिकलटनची विकेट घेतली त्यानंतर तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आला. मुकेश कुमारच्या पहिल्या बॉलला तिलकला एकही रन काढता आली नाही, त्यानंतर मुकेशने पुढचा बॉल स्लो टाकला त्यामुळे तिलक त्याचा शॉट चुकला आणि मुकेशने कॅच पकडला. 2 बॉलमध्ये शून्य रनवर तिलक वर्मा आऊट झाला.

काय सांगते आकडेवारी?

तिलक वर्मा आणि मुकेश कुमार यांच्यातील 'हेड-टू-हेड' रेकॉर्ड पाहिला तर कोणाचाही विश्वास बसणार नाही इतकी ही आकडेवारी एकतर्फी आहे.
इनिंग्स : 5
रन : 26
बॉल : 15
विकेट : 4 वेळा
सरासरी : 6.5
स्ट्राईक रेट : 173.3

स्ट्राईक रेट जास्त, पण टिकण्याची खात्री नाही

या आकडेवारीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तिलक वर्माचा 173.3 चा स्ट्राईक रेट. तिलक वर्मा मुकेशला मारण्याचा प्रयत्न करतो, मोठे फटके मारण्यात तो यशस्वीही होतो, पण हे करत असताना तो आपली विकेट मुकेशला 'गिफ्ट' देऊन जातो. मुकेश कुमारने तिलकला आतापर्यंत 5 डावात तब्बल 4 वेळा तंबूत धाडले आहे. एका टॉप ऑर्डर बॅटरची एका विशिष्ट बॉलरविरुद्धची सरासरी फक्त 6.5 असणे, हे त्याच्या मानसिक दबावाचे लक्षण मानले जाते.
advertisement

आजच्या सामन्यात काय झाले?

आयपीएल 2026 च्या सामन्यातही हेच चित्र पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्सची अवस्था खराब असताना तिलक कडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, मुकेश कुमार बॉलिंगला आला आणि त्याने आपल्या चपळाईने तिलक वर्माला स्वस्तात आऊट केले. मुकेशच्या अचूक टप्प्यासमोर तिलक पुन्हा एकदा गोंधळलेला दिसला.

मुंबईसाठी चिंतेची बाब?

तिलक वर्मा हा मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगचा कणा मानला जातो. मात्र, मुकेश कुमारसारख्या बॉलरविरुद्ध असलेली ही कमकुवत बाजू आता प्रतिस्पर्धी टीमच्या लक्षात आली आहे. आगामी सामन्यांमध्ये इतर टीमही तिलकविरुद्ध मुकेशच्या शैलीचा वापर करून मुंबईला अडचणीत आणू शकतात.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL मधला नवा 'बनी', तिलक वर्माचा पुन्हा तोच पॅटर्न, रेकॉर्ड पाहून बसेल शॉक!
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement