Shramesh Betkar : आयुष्यातला पहिला सिनेमा अन् 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम श्रमेश बेटकरचा डबल धमाका PHOTO

Last Updated:

Maharashtrachi Hasyajatra Shramesh Betkar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम श्रमेश बेटकरला आयुष्यातला पहिला चित्रपट मिळाला आहे. 'लास्ट स्टॉप खांदा' या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी तो सज्ज आहे.

News18
News18
Maharashtrachi Hasyajatra Shramesh Betkar Movie : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विनोदवीर घराघरांत पोहोचले आहेत. आपल्या विनोदी शैलीने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने या विनोदवीरांना चांगला ब्रेक देण्याचं काम केलं आहे. कोणी विनोदवीर कधी मालिकांमध्ये झळकत आहेत..तर कोणी सिनेसृष्टी गाजवताना दिसत आहेत. अशाचप्रकारे महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम श्रमेश बेटकरला आयुष्यातला पहिला चित्रपट मिळाला आहे. 'लास्ट स्टॉप खांदा' या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी तो सज्ज आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता श्रमेश बेटकर, जुईली टेमकर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले असून येत्या 21 नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
महाराष्ट्राच्या लाडक्या जत्रेकरींचा 'लास्ट स्टॉप खांदा'
'लास्ट स्टॉप खांदा' या चित्रपटात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील निखिल बने, मंदार मांडवकर, प्रियांका हांडे, प्रभाकर मोरे हे विनोदवीरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासह जुईली टेमकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश कापरेकर, डॉ. सचिन वामनराव, गणेश गुरव, निशांत जाधव, गिरीश तेंडुलकर, जयश्री गोविंद, धनश्री काडगावकर, अशोक ढगे हे कलाकार या चित्रपटात झळकतील. चिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाती प्रस्तुती केली आहे. प्रदीप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत. श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनित परुळेकर यांनी केलं आहे.
advertisement
'लास्ट स्टॉप खांदा' कधी होणार रिलीज?
प्रेम या संकल्पनेचा एक वेगळा पदर 'लास्ट स्टॉप खांदा... प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट' या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. श्रमेश बेटकर, जुईली टेमकर ही नवी, फ्रेश जोडी या चित्रपटाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. उत्तम कथानक, खुसखुशीत संवादाची फोडणी असलेल्या या चित्रपटाला श्रवणीय संगीताचीही साथ आहे. एक तरुण आणि त्याच्या प्रेमाची गोष्ट असली, तरी प्रत्येकालाच आपलीशी वाटेल अशीच ही गोष्ट आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं मनोरंजन करणारा हा चित्रपट पाहण्यासाठी आता 21 नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Shramesh Betkar : आयुष्यातला पहिला सिनेमा अन् 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'फेम श्रमेश बेटकरचा डबल धमाका PHOTO
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement