Saif Ali Khan : सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला, मुख्य आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Saif Ali Khan Case Update: मुंबई पोलीस सैफचा हल्लेखोर पकडण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांनी सैफच्या मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
मुंबई : सध्या देशभरात सैफ अली खान हल्ला प्रकरण चांगलंच गाजतंय. या प्रकरणात दररोज कोणते ना कोणते अपडेट्स समोर येत आहेत. गेल्या चार दिवसांपासून पोलिस या प्रकरणाची कसून तपास करत असून आता पर्यंत ५० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ठाण्याहून एकाला अटक केली आहे.
मुंबई पोलीस सैफचा हल्लेखोर पकडण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांनी सैफच्या मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांनी आज सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुंबई पोलिस खुलासे केले. रात्री २ वाजण्याच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला पकडण्यासाठी सुमारे १०० अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव मोहम्मद शरीफउल इस्लाम शहजाद (वय 30) आहे. हा आरोपी बांग्लादेशी ओरीजनचा आहे.
advertisement
सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव मोहम्मद शरीफउल इस्लाम शहजाद (वय 30) आहे. आरोपी नाव बदलून पोलिसांना चकमा देत होता. मात्र त्याच्याकडे भारतीय असल्याचे कुठलीच कागदपत्रे नाहीत. त्यामुळे पोलिसांना संशय आहे की तो बांगलादेशी असावा. अद्याप याविषयी काही स्पष्टता नसून चौकशी सुरू आहे.
अटकेनंतर आता हल्लेखोरालाही न्यायालयात हजर केले जाणार असून, सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या सैफ अली खानचाही जबाब पोलीस नोंदवणार आहेत. दरम्यान, या आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 19, 2025 2:33 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Saif Ali Khan : सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला, मुख्य आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी







