सलमान खानचा स्वॅग लय भारी! भाईजानने स्वतःच्या हाताने बनवली भेळ; स्टाईल अशी की भेळवालाही लाजेल, VIDEO

Last Updated:

Salman Khan Making Bhel: एका व्हिडिओने मात्र सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. चक्क सुपरस्टार सलमान खान स्वतःच्या हाताने भेळ बनवून पाहुण्यांना वाढताना दिसतोय.

News18
News18
मुंबई: बॉलिवूडचा 'टायगर' अर्थात सलमान खान जे काही करतो, ते 'लार्जर दॅन लाईफ' असतं. मग तो त्याचा चित्रपट असो किंवा त्याचा वाढदिवस! नुकताच भाईजानने आपला ६० वा वाढदिवस पनवेलच्या फार्महाऊसवर मोठ्या थाटामाटात साजरा केला. या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, पण एका व्हिडिओने मात्र सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. चक्क सुपरस्टार सलमान खान स्वतःच्या हाताने भेळ बनवून पाहुण्यांना वाढताना दिसतोय.
सलमान खान त्याच्या पाहुणचारासाठी प्रसिद्ध आहे. पण ६० व्या वाढदिवसाच्या या खास पार्टीत त्याने चक्क भेळच्या काउंटरचा ताबा घेतला. त्याचे लाडके मित्र रितेश देशमुख आणि जिनिलिया डी'सूझा यांच्यासाठी सलमानने स्वतः चटपटीत भेळ तयार केली.

जिनिलियाने शेअर केला सलमान खानचा व्हिडीओ

जिनिलियाने हा व्हिडिओ शेअर करताना एक गोड कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलंय, "सलमान खानसारखं दुसरं कोणीच नाही! आपल्या माणसांना स्पेशल फील करून देण्यासाठी तो काहीही करू शकतो. यावेळी त्याने आम्हाला चविष्ट 'भाऊंची भेळ' खायला घातली. सलमान, आमचं तुझ्यावर खूप प्रेम आहे!" रितेश आणि जिनिलियाने या भेळला प्रेमाने 'भाऊंची भेळ' असं नाव दिलं आहे.
advertisement












View this post on Instagram























A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)



advertisement

सलमान खानच्या ६० व्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

पनवेलचं फार्महाऊस सलमान्या साठाव्या वाढदिवसासाठी सजलं होतं. यावेळी बॉलिवूडमधील दिग्गजांची मांदियाळी तिथे पाहायला मिळाली. संजय दत्त, करिश्मा कपूर, मिका सिंग, रकुल प्रीत सिंग, जॅकी भगनानी, आदित्य रॉय कपूर यांसारख्या कलाकारांनी या पार्टीला हजेरी लावली. सलीम खान, सलमा खान, अरबाज खान आणि सोहेल खान यांच्यासह संपूर्ण खान कुटुंब या आनंदाच्या क्षणी एकत्र होतं. अरबाजची मुलगी आणि पत्नी शुरा खान यांचीही उपस्थिती चर्चेत होती.
advertisement

सलमानचा साधेपणा आणि स्वॅग

वयाची साठी गाठली तरी सलमानचा उत्साह आणि त्याचा साधेपणा तसाच आहे. जिनिलियाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला असून, "भाई जैसा कोई नहीं!" असं म्हणत अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
सलमान खानचा स्वॅग लय भारी! भाईजानने स्वतःच्या हाताने बनवली भेळ; स्टाईल अशी की भेळवालाही लाजेल, VIDEO
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement