advertisement

झहीरआधी अर्जुन कपूरच्या प्रेमात होती सोनाक्षी सिन्हा; का मोडलं नातं? अभिनेत्यानं केला खुलासा

Last Updated:

सोनाक्षी झहीरआधी बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरच्या प्रेमात होती, ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे. आता सोनाक्षीच्या लग्नाच्या बातम्यांमध्ये अर्जुन कपूरची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. यात अर्जुनने त्याच्या नात्याविषयी भाष्य केलेलं दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हा
मुंबई : सोनाक्षी सिन्हा सध्या खूपच चर्चेत आहे. ती लवकरच झहीर इक्बाल सोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यांच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले आहेत. येत्या २३ जूनला सोनाक्षी सिन्हा झहीरसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या लग्नाला सोनाक्षी सिन्हा आणि झहीरचे कुटुंबीय आणि मित्र मंडळी उपस्थित राहणार आहेत, शिवाय सोनाक्षी फक्त रजिस्टर मॅरेज करणार असून सगळ्यांना रिसेप्शन पार्टी देणार असंही बोललं जातंय. पण सोनाक्षी झहीरआधी बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरच्या प्रेमात होती, ही गोष्ट फार कमी लोकांना माहित आहे. आता सोनाक्षीच्या लग्नाच्या बातम्यांमध्ये अर्जुन कपूरची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. यात अर्जुनने त्याच्या नात्याविषयी भाष्य केलेलं दिसत आहे.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता 23 जून रोजी बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधणार आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याबद्दल मीम्स व्हायरल होत आहेत. 'तेवर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र चित्रपट संपल्यानंतर त्यांचं नातं तुटल्याचा बातम्या समोर आल्या होत्या. आता अर्जुनने एका मुलाखतीत सोनाक्षीसोबत ब्रेकअपचं कारण सांगितलं आहे.
advertisement
Sonakshi -Zaheer : होणाऱ्या नवऱ्यापेक्षा मोठी आहे सोनाक्षी सिन्हा; दोघांच्या वयात आहे इतक्या वर्षांचं अंतर
सोनाक्षीविषयी बोलताना अर्जुन कपूर म्हणाला होता की, 'काही नाती दीर्घकाळ टिकतात पण काही टिकत नाही. ती त्या चित्रपटापूर्तीच मर्यादित राहतात, कारण त्यानंतर लोक आपापल्या मार्गाने पुढे जातात. एक व्यक्ती म्हणून मी अजूनही तिच्यावर खूप प्रेम करतो.'
advertisement
तो पुढे म्हणाला होता, 'आम्ही पार्ट्यांमध्ये कधी भेटलो तरी जास्त बोलत नाही, गप्पा मारत नाही. पण एकमेकांना ओळख नक्कीच दाखवतो. आमच्या दोघांवर कोणाचं दडपण नव्हतं.' असा खुलासा अर्जुन कपूरने केला होता.
एका रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 'सोनाक्षी खूप इमोशनल मुलगी आहे. तिला ज्या लोकांची काळजी आहे त्यांच्याबद्दल ती तिच्या भावना लपवत नाही. दुसरीकडे अर्जुन हा अधिक शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. बहुतेक मुलींप्रमाणेच सोनाक्षीलाही सतत त्याच्या आसपास राहायचं होतं. पण सततचा सहवास आणि कॉल्समुळे अर्जुन कपूरला थोडी चिडचिड होत होती. त्यामुळेच त्यांनी सहमताने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला.'
advertisement
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षी लवकरच तिचा लाँग टाइम बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधणार आहे. वृत्तानुसार, सोनाक्षी आणि झहीर 23 जून रोजी रजिस्टर लग्न करणार आहेत. यानंतर संध्याकाळी रिसेप्शन पार्टी देणार आहेत. त्यांच्या लग्नाची पत्रिकाही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
झहीरआधी अर्जुन कपूरच्या प्रेमात होती सोनाक्षी सिन्हा; का मोडलं नातं? अभिनेत्यानं केला खुलासा
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement