Taapsee Pannu: "जर मला कंगना भेटली तर...", 'सस्ती कॉपी' प्रकरणावर तापसी पन्नू जरा स्पष्टच बोलली
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तापसी पन्नूमधला वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा असलेला वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तापसी पन्नूमधला वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा असलेला वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 2019 सालचं प्रकरण आहे. 2019 मध्ये, कंगना रणौत आणि तिची बहिण रंगोली चंदेल या दोघीही तापसीला 'सस्ती कॉपी' म्हटली होती. तेव्हापासून दोघींमध्ये जोरदार वाद आहे. आता तापसी पन्नूने एका मुलाखतीमध्ये या मुद्द्यावर भाष्य केले आहे. तिने सविस्तरपणे पहिल्यांदाच भाष्य केलंय.
शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये तापसीला तुझ्यामध्ये आणि कंगना रणौतमधील वाद संपूर्ण जगाला माहितीये, नेमका काय आहे हा वाद? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना तापसी म्हणाली की, "खरंतर वाद म्हणजे, दोघंही एकमेकांच्या समोर येतात आणि भांडतात. पण मी कधीही तिच्यासोबत भांडलेली नाही. 'सस्ती कॉपी' अशी कमेंट मला कंगनाने केलेली नाही, तिच्या बहिणीने केलेली आहे. कदाचित, कंगना एवढी मी मानधन घेत नाही. तिच्या इतकी अभिनयामध्ये मी हुशार नाही. म्हणूनच कदाचित तिने मला 'सस्ती कॉपी' असं म्हटलं असेलं."
advertisement
पुढे तापसी म्हणाली की, "मी कंगना एवढी हुशार आहे की नाही किंवा मला तिची स्वस्त कॉपी म्हटल्याबद्दल केव्हाही वाईट वाटलेलं नाही. मी केव्हाच तिच्या विरोधामध्ये एक ओळही बोललेली नाही." कंगना कायमच नेपोकिड्सच्या विरोधात असलेली पाहायला मिळाली. कंगना आणि तापसी या दोघींनीही आपल्या हिंमतीवर बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान प्रस्थापित केलं आहे. या दोघींच्याही फायदा घराणेशाहीला किंवा 'स्टार किड्स'ला झालाय का? असा प्रश्ना तापसीला विचारण्यात आला. यावर ती उत्तर देताना म्हणाली की, " होय, नक्कीच कोणाला तरी याचा फायदा झाला असेल. कदाचित काही लोकांना आम्ही दोघी एकत्र येण्याची भीती वाटत असेल, म्हणून त्यांनी आम्हाला वेगळं ठेवण्याचे प्रयत्न केले असावेत."
advertisement
जर मला केव्हा कंगना भेटली तर मी नक्कीच तिच्यासोबत बोलणार आहे. पण तिचं काय उत्तर असेल? हे मला माहिती नाही. ती माझी अभिनय क्षेत्रातली सिनियर आहे. त्या दृष्टीने मी तिच्यासोबत नक्कीच बोलेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 10:25 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Taapsee Pannu: "जर मला कंगना भेटली तर...", 'सस्ती कॉपी' प्रकरणावर तापसी पन्नू जरा स्पष्टच बोलली









