advertisement

...तर माझ्या ऑफिसमध्येही रेड होईल, CM देवेंद्र फडणवीस लाच प्रकरणावर थेट उत्तर

Last Updated:

मंत्री झिरवाळ यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. याच अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता त्यांनी झिरवाळ यांची बाजू घेतली.

देवेंद्र फडणवीस-नरहरी झिरवाळ
देवेंद्र फडणवीस-नरहरी झिरवाळ
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालयातील लिपिक राजू ढेरिंगे याला लाच घेतल्याच्या प्रकरणात रंगेहात पकडण्यात आल्याने संबंधित विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ अडचणीत आलेले आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईनंतर झिरवाळ यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. याच अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी झिरवाळ यांना वाचविण्याचा प्रयत्न केला.
नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले. उद्या माझ्या कार्यालयात जर एखादी तक्रार मिळाली तरीही रेड होईल. त्यामुळे त्याचा देवेंद्र फडणवीसांची संबंध नसतो आणि नरहरी झिरवाळांशीही संबंध नसतो, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला स्पष्ट सूचना, कुणीही असेल तरी कारवाई करा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मी स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत की, तुमच्याकडे ज्यावेळी तक्रार येते, तेव्हा ती तक्रार कुणाशी संबंधित आहेत, हे अजिबात पाहू नका. मी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पूर्णपणे सूट दिली आहे, संबंधित ठिकाणी जाऊन तुम्ही धडक कारवाई करा, असे फडणवीस म्हणाले.
advertisement

केबिनमध्ये प्रकार झाला म्हणजे मंत्र्याचा आशीर्वाद आहे असे नसते, झिरावाळांसंदर्भात पुरावे नाहीत

जर कुठे चुकीचे काम होत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करणारच. माझ्या कार्यालयात जर कुणी असा व्यवहार केला तरीही कारवाई करा, असे मी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सांगितले आहे. केबिनमध्ये असा व्यवहार झाला तर त्याला मंत्र्‍याचा आशीर्वाद आहे असे समजण्याचे कारण नाही. अद्यापपर्यंत झिरवाळ यांच्या संदर्भाने कोणतेही पुरावे मिळून आले नाहीत, असेही फडणवीस म्हणाले.
advertisement

तर मी राजीनामा देईन, मंत्री झिरवाळ यांचे स्पष्टीकरण

विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर नरहरी झिरवाळ यांना विचारले असता, जर माझ्यापर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे येत असतील आणि ते सिद्ध झाले तर त्याची जबाबदारी घेण्यास मी तयार असेन. आरोप सिद्ध झाले तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे झिरवाळ म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
...तर माझ्या ऑफिसमध्येही रेड होईल, CM देवेंद्र फडणवीस लाच प्रकरणावर थेट उत्तर
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement