Chhaava Teaser : "वाघाच्या बछड्याच्या 'छावा' म्हणतात", छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमिकेत विक्की कौशलचा रौद्र अवतार
- Published by:Minal Gurav
Last Updated:
विक्की कौशलच्या छावा सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. विक्की कौशलच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमिकेचं चाहत्यांकडून कौतुक होतंय.
मुंबई : अभिनेता विक्की कौशलच्या बहुप्रतिक्षित छावा या सिनेमाची गेली अनेक दिवस चर्चा आहे. विक्कीने त्या सिनेमासाठी घेतलेल्या मेहनतीचीही चर्चा आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. प्रेक्षकांची उत्सुकता जास्त न ताणता सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझरमधून विक्की कौशलचा छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमिकेतील रुबाब पाहायला मिळाला आहे.
छावा या सिनेमातील विक्की कौशलचा पहिला लुक समोर आला तेव्हापासूनच सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. टीझरमध्ये विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमिकेत हजारो दुष्मनांशी लढाई करताना दिसत आहे. छावाच्या टीझरबरोबरच सिनेमाची रिलीज डेट देखील घोषित करण्यात आली आहे.
advertisement
छावा सिनेमात ऐतिहासिक ड्रामा पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपूत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षकथा, त्यांचा जीवनपट पाहायला मिळणार आहे. विक्की कौशलबरोबरच या सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, मराठी अभिनेता संतोष जुवेकरही महत्त्वाच्या भुमिकेत आहेत.
advertisement
अभिनेता विक्की कौशल छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भुमिकेत आहेत. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाईंच्या भुमिकेत दिसणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन हे लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. मिमी, लुका छुपी, जरा हटके जरा बचके सारखे कॉमेडी आणि रोमान्स असलेले सिनेमे केल्यानंतर छावा सारखा ऐतिहासिक सिनेमा त्यांनी केला आहे. 6 डिसेंबर 2024 रोजी छावा सिनेमा रिलीज होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 19, 2024 2:07 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Chhaava Teaser : "वाघाच्या बछड्याच्या 'छावा' म्हणतात", छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमिकेत विक्की कौशलचा रौद्र अवतार









