'ती मक्का- मदिनाला गेली अन् परत येताच...' अभिनेत्यानं मुस्लिम मुलीसोबत थाटला संसार; नंतर घडलं असं काही
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
या अभिनेत्यानं दुसऱ्या धर्माच्या मुलीशी लग्नगाठ बांधली होती, पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. हा अभिनेता आहे विंदू दारा सिंग. आपल्या लव्हस्टोरीविषयी काय म्हणाले विंदू दारा सिंग जाणून घ्या.
मुंबई : बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांनी दुसऱ्या धर्माच्या मुलीवर प्रेम केलं आहे, काहींनी संसार देखील थाटला आहे. काही जणांचं नातं टिकलं तर काहींचं टिकू शकलं नाही. अशाच एका अभिनेत्यानं आता आपल्या लव्हस्टोरीविषयी खुलासा केला आहे. या अभिनेत्यानं दुसऱ्या धर्माच्या मुलीशी लग्नगाठ बांधली होती, पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. हा अभिनेता आहे विंदू दारा सिंग. आपल्या लव्हस्टोरीविषयी काय म्हणाले विंदू दारा सिंग जाणून घ्या.
विंदू दारा सिंग हा बॉलिवूडचा प्रसिद्ध चेहरा आहे. विंदूनं आजवर अनेक चित्रपट आणि शोमध्ये काम करत नाव कमावलं आहे. याचसोबत अभिनेता वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आला. या अभिनेत्यानं 1996 मध्ये तब्बूची बहीण फराह नाजशी लग्नगाठ बांधली होती. मात्र काही काळानंतर त्यांचं नाते तुटलं. आता विंदूनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या माजी पत्नीबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. याशिवाय विंदूनं दुसऱ्या धर्मातील मुलीशी लग्न करण्यापूर्वी त्याच्या वडिलांनी त्याला सक्त ताकीद दिल्याचा खुलासाही केला आहे.
advertisement
Samantha Ruth Prabhu : 'आजारपणाबद्दल सांगायला मला भाग पाडलं...' समंथाचा शॉकिंग खुलासा
विंदू दारा सिंह यांनी नुकतंच सिद्धार्थ कन्नन एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत अभिनेत्यानं आपल्या आधीच्या लग्नाबाबत काही रंजक गोष्टी सांगितल्या आहेत. अभिनेत्यानं या मुलाखतीत सांगितलं की, दुसऱ्या धर्मातील मुलीशी लग्न करण्यापूर्वी त्याचे वडील दारा सिंह यांनी अजून एकदा विचार करण्याचा सल्ला दिला होता. त्यांचा असा विश्वास होता की दोन भिन्न धर्मात लग्न करणाऱ्या जोडप्यांपैकी एक जर जास्त धार्मिक असला तर संसार टिकत नाही. याविषयी दारा सिंह यांनी विंदूला दुसऱ्या धर्मात लग्न करण्यापूर्वी नीट विचार करण्याचा सल्ला दिला होता.
advertisement
पण विंदूनं वडिलांच्या या सल्ल्याचा नीट विचार करूनच फराहशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. याविषयी बोलताना विंदूनं सांगितलं, 'फराहने कधीही धर्माची पर्वा केली नाही. कधी कधी ती घरच्यांपासून लपून सिगारेटही ओढायची. तर त्याच्या कुटुंबातील कोणीही धूम्रपान करत नव्हते.'
विंदू पुढे म्हणाला की, 'पूर्वी फराहला धर्माची पर्वा नव्हती. पण जेव्हा ती तिच्या धार्मिक यात्रेसाठी मक्का आणि मदिनाला गेली. तिथून परत आल्यावर ती पूर्णपणे वेगळी व्यक्ती बनली होती. ती अधिक धार्मिक झाली होती. यानंतर आम्हाला एकमेकांच्या अनेक गोष्टी खटकू लागल्या. त्यानंतर आम्ही दोघांनीही वेगळ्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला.' असं तो म्हणाला आहे/
advertisement
घटस्फोटानंतर फराह सोबतचं नातं कसं आहे याविषयी बोलताना विंदू म्हणाला, 'घटस्फोटानंतर फराहने 6 वर्ष मला आमचा फताहला भेटू दिलं नाही. पण यानंतरही फराहशी माझं कोणतंही नाराजी किंवा वैर नाही.' विंदू एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं आपल्या माजी पत्नीचं कौतुक देखील केलं, अभिनेता म्हणाला, 'ती खूप चांगली आई आहे. मी फराहपासून वेगळा झालो असलो तरी आमच्यात चांगली मैत्री आहे.' असा खुलासा त्यानं केला आहे.
advertisement
तब्बूची बहीण फराह नाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर विंदू दारा सिंहने दीना उमरावसोबत दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. दोघांना एक मुलगी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 16, 2024 6:15 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'ती मक्का- मदिनाला गेली अन् परत येताच...' अभिनेत्यानं मुस्लिम मुलीसोबत थाटला संसार; नंतर घडलं असं काही









