advertisement

Dombivli : काही कळायच्या आत पाठीमागून आले; शाळेत जाणाऱ्या मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO

Last Updated:

Dog Attack : डोंबिवली शहरातून एक भटक्या कुत्र्‍याच्या हल्ल्याची घटना समोर आली असून सध्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

News18
News18
डोंबिवली : डोंबिवलीच्या खोणी-पलावा परिसरातील एका सोसायटीत एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत जाणाऱ्या एका शाळकरी विद्यार्थिनीवर अचानक भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली दिसून येत असून सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
चालता चालता घात झाला
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास संबंधित मुलगी शाळेसाठी घराबाहेर पडली होती. याच वेळी चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर अचानक हल्ला चढवला. कुत्र्यांनी घेराव घातल्याने मुलगी घाबरून गेली होती. आरडाओरड ऐकून सोसायटीतील सुरक्षा रक्षक तिच्या मदतीसाठी धावून आले.
घटना सीसीटीव्हीत कैद
सुरक्षा रक्षकाने वेळेवर कुत्र्यांना हाकलून लावले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि मुलीचा जीव वाचला. ही संपूर्ण घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून संबंधित व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
advertisement
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळी-संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli : काही कळायच्या आत पाठीमागून आले; शाळेत जाणाऱ्या मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; थरकाप उडवणारा VIDEO
Next Article
advertisement
अजितदादांचा उमेदवार ठरला 'जायंट किलर', दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव; कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ, संपूर्ण राज्यात चर्चा
Kolhapur ZP: अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर, दिग्गज नेत्याच्या मुलाचा पराभव
  • अजितदादांचा उमेदवार ठरला जायंट किलर

  • जिल्हा परिषद निकालांनी नवं गणित

  • कोल्हापूरमधील निकालांने धक्का

View All
advertisement