ना वाहतूक कोंडी ना रिक्षा भाड्याची गरज, डोंबिवलीकरांनी शोधला शॉर्टकट, गणेशनगरसाठी थेट...
Last Updated:
Dombivli News : डोंबिवली पश्चिमेतील अनेक प्रवासी वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी ठाकुर्ली रेल्वे स्थानकाचा पर्याय निवडत आहेत. मात्र रात्रीच्या वेळी अंधारामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून स्कायवॉकची मागणी जोर धरत आहे.
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे मैदान, गणेशनगर आणि बावनचाळ परिसरातील अनेक नोकरदार सकाळच्या वेळेत वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी वेगळा मार्ग निवडत आहेत. हे प्रवासी चोळे पॉवर हाऊस परिसरातील पडिक जागा किंवा रेल्वे कारशेड आणि भाजीपाला मळ्यांच्या बाजूने पायी चालत थेट ठाकुर्ली रेल्वे स्थानक गाठत आहेत. घरापासून अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत ठाकुर्ली स्थानक गाठता येत असल्याने हा मार्ग मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकातून गणेशनगर भागात जाण्यासाठी शेअर रिक्षाचे भाडे 15 ते 20 रुपये आहे, मात्र एकट्याने प्रवास केल्यास रिक्षाचालक 60 ते 70 रुपये मागतात. त्यातच डोंबिवली स्थानक परिसरातील वाहनांची गर्दी आणि सततची वाहतूक कोंडी प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. रिक्षा स्टँडपर्यंत पोहोचण्यासाठीही गर्दीतून वाट काढावी लागते.
या परिस्थितीमुळे कल्याण, ठाणे आणि मुंबईकडे जाणारे अनेक प्रवासी ठाकुर्ली स्थानकाचा पर्याय स्वीकारत आहेत. काही प्रवासी ठाकुर्ली स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भागात मोकळ्या जागेत दुचाकी उभी करून पुढील प्रवास करतात. मात्र रात्रीच्या वेळी चोळे पॉवर हाऊस, बावनचाळ परिसरात प्रचंड अंधार असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे रात्री हा मार्ग वापरणे प्रवासी टाळतात.
advertisement
प्रवाशांच्या मते ठाकुर्ली रेल्वे स्थानक ते गणेशनगरदरम्यान स्कायवॉक उभारण्यात आल्यास हा प्रश्न कायमचा सुटू शकतो. यासाठी रेल्वे प्रशासन आणि महापालिकेने पुढाकार घ्यावा अशी जोरदार मागणी होत आहे
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 2:31 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
ना वाहतूक कोंडी ना रिक्षा भाड्याची गरज, डोंबिवलीकरांनी शोधला शॉर्टकट, गणेशनगरसाठी थेट...










