चंद्रपूर : रस्ता ओलांडणाऱ्या वाघाचा लोकांनी अगदी जवळ जाऊन काढले व्हिडिओ... ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पद्मापूर-मोहर्ली मार्गावरील धक्कादायक घटना, काल संध्याकाळच्या दरम्यान मोहर्ली गावा जवळून रस्ता ओलांडत होता एक वाघ, हा वाघ दिसतात रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी आपली वाहनं थांबवत वाघाचा काढला व्हिडिओ, यातील काही लोकांनी वाघाच्या अगदी जवळ जात त्याचा काढला व्हिडिओ, वाघाच्या जवळ जाऊन व्हिडिओ काढण्याचा हा प्रकार अतिशय धोकादायक असून वन विभागाने याप्रकरणी दोषी लोकांवर कारवाईचे दिले संकेत



