पुणे हादरलं! रस्त्यावर महिलेचा मृतदेह; अत्याचाराचा संशय, पण मध्यरात्रीचं ते CCTV फुटेज पाहून सगळ्यांचा उडाला थरकाप
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सोमवारी सकाळी नागरिकांना विवस्त्र अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात बलात्कार करून खुनाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, चाकण उत्तर पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले
(सचिन तोडकर, प्रतिनिधी, मंचर) पुणे : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकदा लोक गंभीर जखमी झाल्याच्या घटना समोर येत असतात. आता पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण शहरात काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. आंबेठाण चौकात एका ३२ वर्षीय महिलेवर सहा हिंस्त्र भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून तिचे अक्षरशः लचके तोडले. या भीषण हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
काय घडलं?
मूळच्या नांदेड येथील असलेल्या शोभा विजय वाघमारे या सोमवारी (१६ मार्च) मध्यरात्री दोनच्या सुमारास उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडने जात होत्या. यावेळी अचानक सहा कुत्र्यांच्या टोळक्याने त्यांना घेरले. शोभा यांनी दगड उचलून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र या हिंस्त्र कुत्र्यांपुढे त्यांचा निभाव लागला नाही. कुत्र्यांनी त्यांच्या अंगावरील कपडे फाडून काढले आणि हात, पाय, मान तसंच तोंडाचे लचके तोडण्यास सुरुवात केली. सुमारे १५ मिनिटे हा मृत्यूचा तांडव सुरू होता. प्रचंड रक्तस्रावामुळे शोभा यांनी जागीच प्राण सोडले.
advertisement
सोमवारी सकाळी नागरिकांना विवस्त्र अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात बलात्कार करून खुनाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, चाकण उत्तर पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, कुत्र्यांच्या हल्ल्याची ही धक्कादायक बाब उघड झाली.
या घटनेमुळे चाकण, मेदणकरवाडी आणि परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. प्रशासनाने या मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 1:05 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! रस्त्यावर महिलेचा मृतदेह; अत्याचाराचा संशय, पण मध्यरात्रीचं ते CCTV फुटेज पाहून सगळ्यांचा उडाला थरकाप






