advertisement

Summer Special Food : उन्हाळ्याच्या 'या' समस्येपासून सुटका हवी असेल तर नक्की खा तुती! तज्ञांनीच दिला सल्ला..

Last Updated:
Mulberry Health Benefits : अतिशय सुंदर दिसणारं हे फळ आरोग्यासाठीही तेवढंच फायदेशीर असतं. ते विदेशात मलबेरी आणि भारतात तुती म्हणून ओळखलं जात. तुती हे एक हंगामी फळ असून ते उन्हाळ्यात दोन ते तीन महिनेच बाजारात उपलब्ध होतं. व्हिटॅमिन सी, लोह, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण भरपूर असलेलं हे फळं तुमच्या शरीरासाठी अतिशय अतिशय उपयुक्त असतं.
1/7
गोड, आंबट आणि किंचित तुरट चव असलेलं हे फळ लाल, पांढरं, काळं आणि हिरव्या रंगात आढळतं. आरोग्य तज्ञांच्या मते, तुती खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराला ऊर्जा देखील मिळले. तुम्ही उन्हाळ्यात नियमित तुती खाल्ले तर तुमचे शरीर हंगामी आणि संसर्गजन्य आजारांपासून शरीर सुरक्षित राहते.

2/7
तुतीचे फळ वेगवेगळ्या चवीत आणि रंगामध्ये येते. ते लाल, पांढरे, काळा, हिरवे आणि निळे रंगाचे असू शकते. त्याची चव थोडी आंबट आणि तुरट असते. तुतीचे फळ फक्त मर्यादित ठिकाणीच तुम्हाला मिळू शकते. उन्हाळ्यात मोठ्या फळविक्रेत्याकंडे हे फळ उपलब्ध असते. विशेष म्हणजे याची चव लहान मुलांसोबत आणि प्रौढांना देखील आवडू शकते.

3/7
तुती फळ चवदार असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी, आयर्न, फायबर आणि विविध अँटीऑक्सिडंट्स आढळतात. हे सर्व घटक शरीर बळकट करण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतात.

4/7
आरोग्य तज्ज्ञ डॉ. नरेंद्र सिंह यांनी सांगितले की, तुती खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते. त्यात भरपूर प्रमाणात असलेले फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. तसेच तुतीचे फळं नियमित खाल्ले तर बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या दूर होऊ शकतात. याशिवाय तुम्हाला तुमचं पोट हलकं वाटेल आणि उत्साह देखील जाणवेल. त्यामुळे उन्हाळ्यात काही महिनेच मिळणारं हे फळ खायला अजिबात विसरू नका.

5/7
तुती शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत करते. त्यात असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला संसर्ग आणि विविध रोगांपासून सुरक्षित ठेवतात आणि शरीराला आतून मजबूत बनवतात. याशिवाय थकवा कमी होतो आणि तुम्हाला कायम ताजेतवानं वाटेल.

6/7
हृदयाच्या आरोग्यासाठी देखील तुती अतिशय फायदेशीर असते. त्यामध्ये असलेले पोषक तत्व खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. यामुळे हृदय निरोगी राहते आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत होते.

7/7
आरोग्य तज्ञांच्या मते, तुती त्वचेसाठी देखील उपयुक्त असते. उन्हाळ्यात नियमित तुती खाल्ल्याने त्वचा निरोगी ठेवण्यास आणि डिहायड्रेशन कमी करण्यास मदत करते. यामुळे त्वचा कोरडी न होता मऊ राहते. तुतीचा गुणधर्म हा थंड असतो. त्यामळे तुम्ही ते नियमितपणे खाल्ल्यास शरीराला पोषण तर मिळतंच शिवाय उन्हाळ्यात तुम्हाला ताजेतवानं आणि निरोगी वाटेल. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.)

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement