advertisement

Shocking : खळबळजनक! कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात महिलेचा मृतदेह आढळला भयानक स्थितीत; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Last Updated:

Kalyan Crime News : कल्याण स्थानक परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. जिथे एका महिलेलेसोबत भयानक प्रकार घडलेला आहे.

Burnt unidentified woman found near station area
Burnt unidentified woman found near station area
कल्याण : कल्याण स्टेशन परिसर रात्र-दिवसा प्रवाशांच्या गर्दीने भरलेला असतो. अशातच कल्याण स्थानकात घडलेल्या धक्कादायक घटनेने सर्वांना हादरुन सोडले आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्थानकासमोरील नाल्यात रविवारी एका महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. ही माहिती मिळताच महात्मा पोलिस स्टेशन येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला.
प्राथमिक माहितीनुसार मृत महिला भिकारी असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तिने स्वतःला पेटवून घेतले असावे अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मात्र हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत्यूचे नेमके कारण समजण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
advertisement
मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू
नाल्याजवळ जळालेल्या वस्तू आणि महिलेचा मृतदेह आढळून आल्याने स्थानिक नागरिकांनी लगेच पोलिसांना कळवले. पोलिस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी करत आहेत. महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान कल्याण स्टेशन परिसरात भिकाऱ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. काही वेळा त्यांच्यात वाद किंवा भांडणे होत असल्याची माहिती स्थानिक दुकानदारांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील माहिती पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Shocking : खळबळजनक! कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात महिलेचा मृतदेह आढळला भयानक स्थितीत; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Next Article
advertisement
SL vs ENG : इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार, दुसऱ्या मॅचनंतर समीकरण बदलणार
इंग्लंडचा चमत्कारीक विजय, श्रीलंका पाकिस्तान पैकी एक टीम 100 टक्के बाहेर जाणार,
  • इंग्लंडच्या विजयाने समीकरण बदललं

  • पाकिस्तान वर्ल्डकप मधून बाहेर होणार

  • यजमान श्रीलंकेचही काही खरं नाही

View All
advertisement