धाराशिवमध्ये 'गुवाहाटी' पॅटर्न, भाजपच्या राणा पाटलांनी पळवलेले सदस्य खासगी विमानाने येणार परत
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यापासून इथं सत्तास्थापनेवरून रस्सीखेच निर्माण झाला आहे. इथं भाजपचे आमदारा राणा जगजीत सिंह पाटील आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यापासून इथं सत्तास्थापनेवरून रस्सीखेच निर्माण झाला आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. मात्र शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी याला विरोध केला होता. त्यामुळे महायुतीमध्ये तणाव वाढला. खबरदारी म्हणून भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी राष्ट्रवादीचे सहा भारतीय जनता पार्टीचे 19, शिवसेनेचे दोन आणि काही अपक्ष सदस्यांना पर्यटनाला नेलं आले.
या सर्व सदस्यांनी सुरुवातीला कोकण दर्शन केल्यानंतर कर्नाटक आणि इतर काही ठिकाणी जंगल सफारीचा आनंद घेतला आहे. हे सर्व सदस्य कर्नाटकातील फेमस असलेल्या गोकर्ण पर्यटनस्थळाला देखील जाऊन आले आहेत. इथं त्यांनी ओम बीचचा देखील आनंद घेतला आहे. आता हे सर्व सदस्य पुन्हा धाराशिवमध्ये येत आहेत. त्यांना प्रायव्हेट विमानाने आणले जात आहे. म्हणून सध्या धाराशिवमध्ये गुवाहाटी पॅटर्नची चर्चा सुरू झाली आहे. कारण शिवसेना पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन आधी सुरत, गुवाहाटी आणि नंतर गोव्याला घेऊन गेले होते. असाच पॅटर्न सध्या धाराशिवमध्ये राबवला जात असल्याची चर्चा आहे.
advertisement
खरं तर, धाराशिवमध्ये सत्तास्थापनेवरून रस्सीखेंच सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना -भाजपची पर्यायने महायुतीची सत्ता स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हे सदस्य धाराशिव जिल्ह्यासाठी परत येत आहेत. त्यात त्यांना प्रायव्हेट जेटने परत आणलं जात आहे. त्यामुळे ही विमानवारी चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमध्ये एवढं काय दडलंय? काय असाही प्रश्न समाज माध्यमावर विचारला जात आहे.
advertisement
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टी 19, शिवसेना 15, राष्ट्रवादी काँग्रेस 6, महाविकास आघाडी 11 आणि अपक्ष 4 असे संख्याबळ आहे. इथं बहुमताचा आकडा २८ आहे. हा आकडा जो पार करेल तो जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवणार आहे. त्यामुळेच ही सहल घडवली असल्याची चर्चा धाराशिव जिल्ह्यात रंगली असून जंगल सफारी, बीच, प्रायव्हेट जेट या ठिकाणचे सगळे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने गुवाहाटी पॅटर्नची चर्चा जोरात रंगली आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 7:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धाराशिवमध्ये 'गुवाहाटी' पॅटर्न, भाजपच्या राणा पाटलांनी पळवलेले सदस्य खासगी विमानाने येणार परत










