Ulhasnagar : भयंकर! भांडण सोडवायला गेला अन् आयुष्यभराची जखम घेऊन परतला; पहा काय घडलं त्या दिवशी
Last Updated:
Ulhasnagar Crime news : उल्हासनगर कॅम्प क्रमांक १ येथे जुन्या वादातून चौघांनी एका व्यक्तीसोबत भयानक कांड केलेल आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक 1 येथील आदर्शनगर परिसरात कमानीजवळ जुन्या वादातून झालेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या शिवम फुटे यांच्यावर चौघांनी तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना 6 फेब्रुवारी रोजी रात्री घडली.
मित्रासाठी धावून जाणं पडलं महागात
मिळालेल्या माहितीनुसार, शिवम फुटे हे आपल्या मित्राला सुरू असलेल्या वादातून सोडवण्यासाठी घटनास्थळी गेले होते. मात्र जुन्या रागातून प्रभूराज उर्फ बाबू पाटील, लखन पाटील, रूपराज पाटील आणि संतोषी राजा पाटील या चौघांनी एकत्र येत फुटे यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींकडे तलवार असल्याचे सांगितले जात आहे.
हल्ल्यादरम्यान लखन पाटील याने फुटे यांच्या डाव्या हातावर तलवारीने जोरदार वार केला तर प्रभूराज उर्फ बाबू पाटील याने उजव्या हातावर हल्ला केला. या हल्ल्यात शिवम फुटे यांच्या हाताची काही बोटे छाटली गेली असून ते गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर जखमी फुटे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
advertisement
नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी शिवम फुटे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे उल्हासनगर पोलिसांनी चारही आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 11:12 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Ulhasnagar : भयंकर! भांडण सोडवायला गेला अन् आयुष्यभराची जखम घेऊन परतला; पहा काय घडलं त्या दिवशी








