advertisement

Gold Silver Price: चांदीच्या किमतीत ६५ हजारांची मोठी घसरण, सोन्याचे दरही गडगडले, आजचे दर काय?

Last Updated:

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या दरांबाबत सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सोनं-चांदीच्या दरात आठवडाभरात घसरण दिसून आली आहे.

चांदीच्या किमतीत ६५ हजारांची मोठी घसरण, सोन्याचे दरही गडगडले, आजचे दर काय?
चांदीच्या किमतीत ६५ हजारांची मोठी घसरण, सोन्याचे दरही गडगडले, आजचे दर काय?
मुंबई: लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या दरांबाबत सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या आठवडाभरात देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत लक्षणीय घट झाली असून, चांदीचे दरही मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत. जागतिक घडामोडींचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येत आहे.

सोन्याच्या दरात आठवड्याभरात मोठी कपात

गेल्या सात दिवसांत २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम ३,९८० रुपयांची घसरण झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ३,६५० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. आज, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५६,७५० रुपये आहे, तर मुंबईत हेच दर १,५६,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिरावले आहेत.
advertisement

प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम):

शहर२२ कॅरेट (रुपये)२४ कॅरेट (रुपये)
मुंबई१,४३,५५०१,५६,६००
पुणे१,४३,५५०१,५६,६००
दिल्ली१,४३,७००१,५६,७५०
चेन्नई१,४३,५५०१,५६,६००
बेंगळुरू१,४३,५५०१,५६,६००
advertisement

चांदीच्या दरात ६५ हजारांची घसरण

सोन्यापेक्षाही चांदीच्या किमतीत झालेली घसरण अधिक धक्कादायक आहे. एका आठवड्यात चांदीच्या दरात तब्बल ६५,००० रुपयांची घट झाली आहे. ३० जानेवारी रोजी ४ लाखांच्या पार गेलेली चांदी आज प्रति किलो २,८५,००० रुपयांवर आली आहे.

भविष्यात वाढीचे संकेत

सध्या जरी किमती कमी झाल्या असल्या तरी, 'जेपी मॉर्गन'च्या अंदाजानुसार वर्षाच्या अखेरीस सोने प्रति औंस ६,३०० डॉलरपर्यंत पोहोचू शकते. मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोन्याची खरेदी आणि गुंतवणूकदारांची वाढती मागणी यामुळे २०२६ मध्ये किंमत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोन्याचा दर प्रति औंस ५,०८७.७३ डॉलर असून चांदीचा दर ७४ डॉलर प्रति औंस आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price: चांदीच्या किमतीत ६५ हजारांची मोठी घसरण, सोन्याचे दरही गडगडले, आजचे दर काय?
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement