भारताच्या सीमेवरील 'या' 7 नयनरम्य ठिकाणांना तुम्ही भेट द्यायलाच हवी!

Last Updated:

भारताच्या सीमेवर काही खूप सुंदर ठिकाणं आहेत. ऐतिहासिक वारसास्थळं, नयनरम्य पर्वतीय शहरांना आपण एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

भारताच्या सीमेवरील नयनरम्य ठिकाणं
भारताच्या सीमेवरील नयनरम्य ठिकाणं
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारत चीन, नेपाळ, श्रीलंका पाकिस्तानबरोबर सीमा शेअर करतो. भारताच्या सीमेवर काही खूप सुंदर ठिकाणं आहेत. ऐतिहासिक वारसास्थळं, नयनरम्य पर्वतीय शहरांना आपण एकदा तरी भेट द्यायलाच हवी. आज आपण भारतीय सीमेवरील अशाच काही ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत. ‘न्यूजेबल एशियानेट न्यूज’नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
1. धारचुला (भारत-नेपाळ सीमा): भारत-नेपाळ सीमेवर वसलेलं धारचुला खूपच सुंदर आहे. इथे बर्फाच्छादित पंचचुली शिखर आहे. या प्रदेशात मनसा सरोवर आहे. काली नदीवरचा एक फूट ओव्हर ब्रिज धारचुलाला नेपाळला जोडतो. त्यामुळे एक अनोखं आणि नयनरम्य बॉर्डर क्रॉसिंग पाहायला मिळतं.
2. पँगॉन्ग लेक (भारत-चीन बॉर्डर): लडाखच्या लेह जिल्ह्यातील प्रसिद्ध पँगॉन्ग तलावाचा परिचय देण्याची गरज नाही. पक्ष्यांच्या अनेक प्रजाती इथे आढळतात. हे सरोवर भारत-चीन सीमेवर आहे, त्याचा एक महत्त्वाचा भाग चीनच्या हद्दीत येतो. सभोवतालच्या पर्वतांमुळे हे सरोवर खूपच सुंदर दिसते.
advertisement
3. मालदा (भारत-बांगलादेश सीमा): बांगलादेश सीमेजवळ मालदा शहर आहे. हे भारतातील आंब्याचे शहर म्हणून ओळखले जाते. महानदी आणि कालिंदी नद्यांच्या संगमावर इथे आकर्षक वास्तुशिल्प आहेत. स्थानिक माती आणि संस्कृतीत खोलवर रुजलेल्या आंब्याच्या उत्कृष्ट हिमसागर जातीवर या प्रदेशाचा दावा आहे.
4. नेलॉन्ग व्हॅली (भारत-चीन बॉर्डर): गंगोत्री नॅशनल पार्कमध्ये नेलॉन्ग व्हॅली आहे. इथले लँडस्केप आणि तिबेट पठाराचे चित्तथरारक दृश्य नयनरम्य आहे. भारत-चीन सीमेपासून अवघ्या 45 किमी अंतरावर एक अभयारण्य आहे. इथे सिक्रेटिव्ह स्नो लेपर्ड आणि पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आढळतात. इथे प्रवेशासाठी परवानग्या आणि फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक आहे.
advertisement
5. नाथू ला पास-मानसरोवर (भारत-चीन बॉर्डर): 14,200 फूट उंचीवर असलेल्या नाथू ला पासवर भारत-चीन सीमेची झलक पाहायला मिळते. इथून चीन-तिबेट सीमेवर प्रवेश करता येतो. हा कैलास मानसरोवर यात्रेचा मार्गही आहे. या सीमेवर तैनात असलेले भारतीय आणि चिनी सैनिक या प्रदेशातील डेलिकेट बॅलन्सची आठवण करून देतात.
6. वाघा बॉर्डर (भारत-पाकिस्तान बॉर्डर): वाघा हे गाव भारत-पाकिस्तान सीमेजवळ आहे त्यामुळे त्या सीमेला वाघा सीमा म्हणतात. इथे राष्ट्रध्वज अवतरणाचा सोहळा आयोजित केला जातो. हा समारंभ केवळ भारताच्या बाजूने होतो. हा सौहार्दपूर्ण सोहळा भारत आणि पाकिस्तानमधील अपवादात्मक बाँड दर्शवतो.
advertisement
7. पंबन ब्रिज (भारत-श्रीलंका बॉर्डर): पंबन ब्रिजला राम सेतू असेही म्हणतात. हा ब्रिज भारताची एकात्म ओळख दर्शवतो. तो राष्ट्रीय स्मारकही आहे. हा पूल पूर्वी भारत आणि श्रीलंकेला जोडत होता आणि सध्या तो ऐतिहासिक वारसा आहे. हा मन्नार मरिन नॅशनल पार्कच्या आखाताचा भाग आहे. तो खडक आणि जलचर वन्यजीवांसाठी प्रसिद्ध आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
भारताच्या सीमेवरील 'या' 7 नयनरम्य ठिकाणांना तुम्ही भेट द्यायलाच हवी!
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement