advertisement

Weather Update: एप्रिलचा फील फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, विकेण्डला सूर्य तापणार, या जिल्ह्यांसाठी अलर्ट

Last Updated:

Weather Update: मुंबईत फेब्रुवारीतच एप्रिलसारखी उष्णता जाणवत असून तापमान सरासरीपेक्षा ४ अंशांनी वाढले आहे. महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही, हवामान कोरडे आणि उष्ण राहणार.

News18
News18
Weather Update: फेब्रुवारीचा जेमतेम पहिला आठवडा सरला आहे आणि त्यासोबत उन्हाच्या झळा आणखी तीव्र झाल्या आहेत. दुसऱ्या आठवड्यात एप्रिल सारखी परिस्थिती जाणवण्याची शक्यता आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. विकेण्डला राज्याच्या हवामानात आता वेगाने बदल होताना दिसत आहेत. एकीकडे उत्तर भारतात अजूनही काही ठिकाणी गारठा जाणवत असला, तरी महाराष्ट्रात मात्र उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. विशेषतः मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर यंदा उन्हाळा वेळेआधीच दाखल झाल्याचा भास होत आहे.
मुंबईत फेब्रुवारीतच एप्रिलसारखी उष्णता
स्कायमेट हवामान तज्ज्ञ महेश बलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील तापमानाने सध्या सर्वांची चिंता वाढवली आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, मुंबईचे कमाल तापमान सरासरीपेक्षा चक्क ४ अंशांनी वाढून ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. किमान तापमान देखील सामान्यपेक्षा ३ अंशांनी जास्त नोंदवले जात आहे. साधारणपणे फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात जी उष्णता जाणवते, ती यंदा पहिल्या आठवड्यातच जाणवू लागली आहे. यामुळे मुंबईकरांना घामाच्या धारा आणि उन्हाच्या चटक्यांचा सामना करावा लागत आहे.
advertisement
पुढील दोन-तीन दिवस महत्त्वाचे
स्कायमेटच्या अंदाजानुसार, येत्या दोन ते तीन दिवसांत वाऱ्यांच्या दिशेत बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई आणि आसपासच्या परिसरातील तापमानात थोडी घट होऊन काहीसा दिलासा मिळू शकतो, मात्र ही सवलत फार मोठी नसेल. वाऱ्यांचा वेग वाढल्याने काही अंशी उकाडा कमी होईल, पण कडाक्याची थंडी आता पुन्हा परतण्याची शक्यता धुसर आहे.
advertisement
राज्यातील इतर भागांची स्थिती
राज्यातील उर्वरित भागात, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान मुख्यत्वे कोरडे राहणार आहे. उत्तर-पश्चिमेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे काही जिल्ह्यांत रात्रीचा गारठा टिकून आहे, मात्र दिवसाच्या तापमानाचा पारा चढताच राहणार आहे. उत्तर भारतात ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान पुन्हा एकदा 'पश्चिमी विक्षोभ' (Western Disturbance) धडकणार असला, तरी त्याचा परिणाम केवळ डोंगराळ राज्यांपर्यंतच मर्यादित राहील. त्याचा कोणताही थेट प्रभाव महाराष्ट्रावर पडणार नसल्याने पावसाची शक्यता नाही.
advertisement
पावसाबाबत काय अंदाज?
संपूर्ण देशाचा विचार करता, १ जानेवारीपासून ५ फेब्रुवारीपर्यंत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ३४ टक्क्यांनी कमी राहिले आहे. महाराष्ट्रातही सध्या पाऊस किंवा ढगाळ वातावरणाची चिन्हे नाहीत. एकूणच, यंदा फेब्रुवारी महिना कोरडा आणि नेहमीपेक्षा जास्त उष्ण राहण्याची चिन्हे आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Update: एप्रिलचा फील फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, विकेण्डला सूर्य तापणार, या जिल्ह्यांसाठी अलर्ट
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement