सकाळी 'हॉल तिकीट' आणलं, मग दुपारी नेमकं काय घडलं? पुण्यात बारावीच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, दरवाजा उघडताच हादरली आई
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
अभ्यासाचा प्रचंड ताण आणि बोर्डाच्या परीक्षेच्या दडपणातून बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली.
पुणे : पुण्यातून एक अत्यंत वेदनादायक घटना समोर आली आहे. परीक्षेच्या ओझ्याखाली एका उमलत्या मुलाचा अंत झाला आहे. अभ्यासाचा प्रचंड ताण आणि बोर्डाच्या परीक्षेच्या दडपणातून बारावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी (६ फेब्रुवारी) दुपारी भोसरीतील संत तुकारामनगर परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली.
नेमकं प्रकरण काय?
प्रणय सुनील खैरे (वय १७) असं या दुर्दैवी विद्यार्थ्याचं नाव आहे. तो भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयात सायन्स शाखेत बारावीत शिक्षण घेत होता. सध्या बोर्डाच्या परीक्षा तोंडावर असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरण असतं. प्रणयचे महाविद्यालयातील काही शैक्षणिक प्रकल्प (Projects) अपूर्ण राहिले होते, तसंच त्याने प्रात्यक्षिक परीक्षा (Practical Exams) दिली नव्हती. याच गोष्टीमुळे तो गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चिंतेत होता, अशी माहिती त्याचे मित्र आणि नातेवाईकांनी दिली.
advertisement
घरात एकटा असताना टोकाचं पाऊल
शुक्रवारी सकाळी प्रणय आपल्या आईसोबत महाविद्यालयात परीक्षेचं 'हॉल तिकीट' आणण्यासाठी गेला होता. तिथून परतल्यानंतर त्याची आई बँकेत कामावर निघून गेली, तर वडील काही कामानिमित्त गावी गेले होते. घरात कुणीही नसल्याची संधी साधून नैराश्यात असलेल्या प्रणयने आयुष्याचा शेवट करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. आई कामावरून घरी परतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
advertisement
मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
प्रणयच्या या टोकाच्या पावलामुळे भोसरी परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. एक हुशार आणि तरुण मुलगा अशा प्रकारे सोडून गेल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर असणारे पालकांचे आणि अभ्यासाचे दडपण त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी किती घातक ठरू शकते, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
advertisement
भोसरी पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत असून, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे शैक्षणिक वर्तुळातून चिंता व्यक्त केली जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 6:45 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
सकाळी 'हॉल तिकीट' आणलं, मग दुपारी नेमकं काय घडलं? पुण्यात बारावीच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, दरवाजा उघडताच हादरली आई







