किंमत फक्त 160! भोईराज हॉटेलची खास मच्छी थाळी खवय्यांची पहिली पसंत

Last Updated:

हॉटेल व्यवसाय मध्ये ग्राहकांना आवडेल अशा स्वरूपाचे जेवण द्यावं लागतं. कारण कॉलिटी उत्तम असल्यास ग्राहकांचा देखील अगदी चांगला प्रतिसाद लाभतो. तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय अगदी स्वस्तात मस्त आणि तुमच्या खिशाला परवडेल असं चविष्ट जेवण.

+
भोईराज

भोईराज हॉटेलची मच्छी थाळी खाल्ली आहे का ?

प्रशांत पवार - प्रतिनिधी
बीड : वडवणी तालुक्यातील उकळी फाटा येथे एक छोटेसे हॉटेल दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले. मालक राम कचरे आणि लखन कचरे या दोन भावंडांनी मोठ्या उत्साहाने हॉटेल उभारले आणि नाव ठेवले भोईराज हॉटेल. ग्राहकांना उत्तम चव देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या हॉटेलने सुरुवातीपासूनच खवय्यांना आकर्षित केले आहे.
विशेषतः नॉनव्हेज प्रेमींसाठी येथे असलेली स्पेशल मच्छी थाळी हा हॉटेलचा मुख्य आकर्षणबिंदू आहे. फक्त 160 रुपयांत चविष्ट, दर्जेदार आणि खिशाला परवडणारी ही थाळी ग्राहकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. इतरत्र 250 ते 300 रुपयांना मिळणारी ही थाळी अतिशय स्वस्त आणि उत्कृष्ट दर्जाची असल्याने ग्राहक दूरवरून देखील खास भोईराजच्या थाळीची चव चाखण्यासाठी येत आहेत.
advertisement
काय आहे मच्छी थाळीचे वैशिष्ट्य?
भोईराज हॉटेलची मच्छी थाळी नुसती पोटभरीचीच नाही, तर मनालाही आनंद देणारी आहे. इथे वापरण्यात येणाऱ्या माशांच्या ताजेपणावर विशेष लक्ष दिले जाते. पदार्थांची रेसिपी पारंपरिक असूनही ग्राहकांच्या चवीनुसार ती हलकी बदलली जाते. थाळीतील पदार्थ चवीला तोंडाला पाणी सुटायला लावणारे असल्यामुळे इथल्या सेवेला ग्राहकांची पसंती मिळते.
ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद:
केवळ दोन महिन्यांत भोईराज हॉटेलचे नाव वडवणी तालुक्यातच नव्हे, तर इतर जिल्ह्यांतही पसरले आहे. अनेक लोकांनी सोशल मीडियावर हॉटेलच्या चविष्ट पदार्थांचे कौतुक केले आहे. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता हॉटेलचे मालक पुढे आणखी पदार्थांच्या विशेष थाळ्या सुरू करण्याचा विचार करत आहेत.
advertisement
चव आणि यश:
भोईराज हॉटेलने सिद्ध केले आहे की ग्राहकांना आवडेल अशी चव आणि सेवा दिल्यास यश निश्चित आहे. वडवणीतील हे हॉटेल चविष्ट मच्छी थाळीने खवय्यांचे मन जिंकत असून महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरले आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
किंमत फक्त 160! भोईराज हॉटेलची खास मच्छी थाळी खवय्यांची पहिली पसंत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement