advertisement

Cervical Cancer : दुर्लक्ष करणं जीवावर बेतेल! महिलांमध्ये वेगाने वाढतोय ‘या’ कॅन्सरचा धोका, गर्भाशयाच्या मुखावर होतो थेट परिणाम

Last Updated:

Cervical Cancer : भारतात दरवर्षी सुमारे 1.25 लाख महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो आणि त्यातले अर्ध्याहून अधिक बळी जातात. दुर्दैव म्हणजे, 70 टक्के प्रकरणे ही आजाराचा तिसरा टप्पा गाठल्यानंतरच समोर येतात.

News18
News18
Cervical Cancer : भारतात दरवर्षी सुमारे 1.25 लाख महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो आणि त्यातले अर्ध्याहून अधिक बळी जातात. दुर्दैव म्हणजे, 70 टक्के प्रकरणे ही आजाराचा तिसरा टप्पा गाठल्यानंतरच समोर येतात. ग्रामीण भागात तपासणी सुविधा कमी असल्याने हे प्रमाण अधिक आहे. समाजाने महिलांच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक होण्याची गरज आहे. महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता 'नियमित तपासणी, लसीकरण व जीवनशैलीत बदल' हे त्रिसूत्र अंगीकारण्याची आज गरज आहे. वेळेवर घेतलेली काळजी कर्करोगावर सर्वांत प्रभावी इलाज आहे! गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) हा भारतातील महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी दुसऱ्या क्रमांकावर आहे. वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेला; पण पूर्णतः प्रतिबंध करता येणारा हा आजार अजूनही महिलांच्या जीवावर बेतत आहे. लवकर निदान आणि योग्य उपचार झाल्यास या आजारावर सहज मात करता येते; मात्र याची लक्षणे सुरुवातीस दिसत नाहीत, हेच या आजाराचे मुख्य धोकादायक वैशिष्ट्य आहे. ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो, या विषाणूचे नाव 'ह्युमन पेपिलोमा व्हायरस' असे आहे. 'एचपीव्ही'चे जवळपास 200 प्रकार आहेत. त्यातील जवळपास 40 प्रकार जननेंद्रियांजवळ दिसतात. त्यातील काहींमुळे चामखीळसारखे प्रकार होऊ शकतात; पण ते गंभीर प्रकार आहेत, ज्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची लक्षणे
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग अनेक वर्षे कोणतीही लक्षणे न देता वाढत राहतो मात्र पुढे जाऊन काही लक्षणे दिसू लागतात. मासिक पाळीव्यतिरिक्त किंवा लैंगिक संबंधानंतर रक्तस्त्राव होतो. दुर्गंधीयुक्त व पाणचट स्त्राव. पाठीचा किंवा कंबरेचा वेदनादायक त्रास. लघवी किंवा शौच करताना त्रास होणे. वजन कमी होणे, थकवा, अशक्तपणा जाणवणे आदी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जोखीम वाढवणारे घटक वयाच्या लहान वयात लैंगिक संबंध सुरू होणे. अनेक लैंगिक भागीदार असणे. धूम्रपान करणे. एचपीव्ही किंवा इतर इम्युनिटी कमी करणारे आजार. दीर्घकाळ गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर. पाचपेक्षा अधिक प्रसूती.
advertisement
काय असतो गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग?
गर्भाशयाच्या खालील भागाला 'गर्भाशयाचे मुख' (ग्रीवा) म्हणतात. याच भागात जर असामान्य पेशींची वाढ होत गेली आणि ती नियंत्रित न राहता ट्युमरमध्ये रूपांतर झाली, तर त्याला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणतात. हा कर्करोग हळूहळू वाढतो आणि योग्य वेळी लक्ष दिल्यास अगोदरच निदान करता येते.
तपासण्या आणि निदान
पॅप स्मीअर टेस्ट : यामध्ये 9 गर्भाशयाच्या मुखावरील पेशींचा नमुना घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली तपासला जातो. ही अत्यंत सोपी, वेदनारहित आणि स्वस्त तपासणी
advertisement
आहे.
एचपीव्ही डीएनए चाचणी : या चाचणीत एचपीव्ही विषाणूची उपस्थिती ओळखली जाते. विशेषतः 30 वर्षांवरील महिलांनी ही तपासणी नियमित करून घ्यावी.
कोल्पोस्कोपी : जर पॅप टेस्टमध्ये 3 काही असामान्यता दिली, तर गर्भाशयाचे मुख मोठ्या लेन्सने पाहून विशिष्ट भागाची बायोप्सी केली जाते.
प्रतिबंध : लसीकरण आणि जनजागृती हाच खरा उपाय एचपीव्ही लसीकरण
हा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील सर्वांत प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. तामिळनाडू राज्याने 14 वर्षांच्या मुलींना एचपीव्ही लसीकरण देण्यासाठी 36 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पंजाब, सिक्कीम, कर्नाटक, छत्तीसगड आणि महाराष्ट्र यांसारख्या इतर राज्यांनीही पायलट प्रकल्पांचा भाग म्हणून विशिष्ट जिल्ह्यांमध्ये मोफत एचपीव्ही लसीकरण कार्यक्रमांची घोषणा केली आहे. केंद्र सरकार 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून राष्ट्रीय एचपीव्ही लसीकरण कार्यक्रमाची योजना आखत आहे. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने या वयोगटातील सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमात एचपीव्ही लस समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे.
advertisement
उपचारपद्धती
• कर्करोगाचा टप्पा (स्टेज) ठरवल्यानंतर त्यावर योग्य उपचार केल जातो
• शस्त्रक्रिया (सर्जरी) : सुरुवातीच्या यात गर्भाशय व गर्भाशयाचे मुख काढले जाते.
• किरणोपचार (रेडिएशन थेरपी) : प्रगत अवस्थेत वापरले जाते.
● रसायनोपचार (किमोथेरपी) : कधीकधी किरणोपचारासोबत वापरले जाते.
● लक्ष्यित थेरपी व इम्युनोथेरपी : नवीन उपचारपद्धतींमुळे आता अधिक प्रभावी उपचार शक्य झाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cervical Cancer : दुर्लक्ष करणं जीवावर बेतेल! महिलांमध्ये वेगाने वाढतोय ‘या’ कॅन्सरचा धोका, गर्भाशयाच्या मुखावर होतो थेट परिणाम
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement