advertisement

Makeup Mistakes : मेकअप करताना 'या' चुका टाळा, अन्यथा कमी वयातच चेहऱ्यावर येतील सुरकुत्या! तज्ज्ञांची माहिती

Last Updated:

Avoid these mistakes while makeup : डॉ. राणी यांच्यामते, मेकअप करताना काही चुळका केल्यास त्वचेची छिद्रे बंद होणे, दीर्घकालीन दाह आणि अगदी दीर्घकालीन त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यांनी सांगितले की, तुमच्या त्वचेला चांगल्या उत्पादनांपेक्षा सातत्यपूर्ण काळजी घेण्याची जास्त गरज आहे.

मेकअप करताना या चुका टाळा..
मेकअप करताना या चुका टाळा..
मुंबई : बरेच लोक रोज मेकअप करतात, मग तो हलका मेकअप असो की, हेव्ही. पण रोज मेकअप करताना आपल्याला काही गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे, अन्यथा आपल्या त्वचेचे खूप नुकसान होऊ शकते. याबद्दल तज्ज्ञांनी आपल्याला माहिती दिली आहे. चला तर मग पाहूया मेकअप करताना आपण कोणत्या चुका करणं टाळलं पाहिजे.
त्वचारोगतज्ज्ञ सल्लागार डॉ. राणी मनोहरी कुप्पुस्वामी यांनी इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे त्यामध्ये त्यांनी मेकअपचा चुकीचा वापर आणि चुकीच्या स्वच्छता सवयींमुळे होणारे दुष्परिणाम सांगितले आहेत. वर्षानुवर्षे मेकअप करताना केलेल्या चुकांमुळे त्वचेला किती नुकसान होऊ शकते याबद्दल त्यांनी माहिती दिली.
डॉ. राणी यांच्यामते, मेकअप करताना काही चुळका केल्यास त्वचेची छिद्रे बंद होणे, दीर्घकालीन दाह आणि अगदी दीर्घकालीन त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यांनी सांगितले की, तुमच्या त्वचेला चांगल्या उत्पादनांपेक्षा जास्त गरज आहे ती, सातत्यपूर्ण काळजी घेण्याची आणि योग्य मार्गदर्शनाची.
advertisement
मेकअप करताना या चुका टाळा..
- सर्वात सामान्य चूक जी बरेच लोक करतात ती म्हणजे, चेहरा न धुता मेकअप लावणे. त्याचप्रमाणे काही लोक मॉइश्चरायझर न लावता फाउंडेशन आणि प्रायमर लावतात. यामुळे मेकअपचे कण छिद्रे बंद करतात आणि पुढे मुरुमे, ब्लॅकहेड्स आणि पुरळ यांची समस्या वाढते. म्हणून मेकअप लावण्यापूर्वी तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा, त्यावर मॉइश्चरायझर लावा आणि नंतरच मेकअप करा.
advertisement
- यासोबतच जे लोक रोज मेकअप करतात ते बहुतेकदा ब्रश व्यवस्थित स्वच्छ न करण्याची चूक करतात. चांगले स्वच्छ न केलेले ब्रश किंवा स्पंज वापरल्याने घाणेरडे बॅक्टेरिया जे यामध्ये असू शकतात, ते आपल्या त्वचेमध्ये जातात. ज्यामुळे चेहऱ्याला खाज सुटणे, जळजळ आणि पिंपल्सची समस्या वाढू शकते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा सौम्य शॅम्पू किंवा क्लींजरने तुमचे ब्रश आणि स्पंज स्वच्छ करून उन्हात वाळवा.
advertisement
- काही लोक रोज हेव्ही फाउंडेशन वापरतात. मात्र फाउंडेशनच्या जाड थरामुळे त्वचेची छिद्र बंद होऊ शकतात. वारंवार असे झाल्यास तुमची त्वचा निस्तेज दिसू शकते आणि अकाली सुरकुत्या येऊ शकतात. तुम्हाला रोज मेकअप करायचाच असेल तर हलका करा, रोज सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर वापरा.
- ही सवय तर आपल्या त्वचेसाठी खूपच घातक ठरू शकते. मेकअप लावून झोपणे अत्यंत चुकीचे आहे. मेकअप न काढता झोपल्याने रात्रभर त्वचेला श्वास घेण्यास अडथळा येतो, ज्यामुळे निस्तेजपणा, कोरडेपणा आणि मुरुमे येतात. म्हणून झोपण्यापूर्वी मेकअप रिमूव्हरने तुमचा चेहरा स्वच्छ करा, नंतर तुमचा चेहरा धुवा आणि शेवटी मॉइश्चरायझर लावून झोपा.
advertisement
advertisement
या सर्व चुका टाळण्यासोबतच तुम्ही तुमचे स्किन केअर रुटीन व्यवस्थित फॉलो केले पाहिजे. रात्री मेकअप काढून झोपणे आणि मॉइश्चरायझर लावणे खूप गरजेचे आहे. यामुळे तुमच्या त्वचेला स्वतःला दुरुस्त करण्यास मदत होते. योग्य स्किनकेअर आणि काही चुका टाळून तुम्ही तुमची त्वचा नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेऊ शकता. तसेच ती दीर्घकाळ तरुणही राहील.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Makeup Mistakes : मेकअप करताना 'या' चुका टाळा, अन्यथा कमी वयातच चेहऱ्यावर येतील सुरकुत्या! तज्ज्ञांची माहिती
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement