advertisement

Ajit Pawar Plane Crash: रोहित पवारांनी पितळं उघडं पाडलं? डीजीसीए पाठोपाठ एकनाथ शिंदेंचा विमान कंपनीला मोठा दणका

Last Updated:

Ajit Pawar Plane Crash: रोहित पवारांकडून व्हीएसआर विमान कंपनीवर सवाल उपस्थित करण्यात येत असताना दुसरीकडे आता शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

रोहित पवारांनी पितळं उघडं पाडलं? डीजीसीए पाठोपाठ एकनाथ शिंदेंचा विमान कंपनीला मोठा दणका
रोहित पवारांनी पितळं उघडं पाडलं? डीजीसीए पाठोपाठ एकनाथ शिंदेंचा विमान कंपनीला मोठा दणका
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर राज्यात राजकारणाला मोठा धक्का बसला.अजितदादांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अपघातावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजितदादांच्या विमान अपघातप्रकरणात घातपात आहे का अशी शंका उपस्थित करताना त्यांनी आरोपांचा धुरळा उडवला आहे. रोहित पवारांकडून व्हीएसआर विमान कंपनीवर सवाल उपस्थित करण्यात येत असताना दुसरीकडे आता शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 'व्हीएसआर' (VSR) कंपनीच्या विमानांमधून प्रवास न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे पक्षाचे कोणतेही मंत्री, आमदार, नेते आणि स्वतः एकनाथ शिंदे या कंपनीच्या विमानाची सेवा वापरणार नाहीत.

नेमका निर्णय काय?

२८ जानेवारी रोजी झालेल्या ज्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले, ते विमान 'व्हीएसआर' कंपनीचे 'लेअर जेट' (Learjet) प्रकारचे चार्टर्ड विमान होते. या घटनेनंतर पक्षातील नेत्यांनी आणि आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव या कंपनीच्या विमानांवर बहिष्कार टाकण्याची विनंती एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. ही विनंती मान्य करत त्यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
advertisement

DGCA कडूनही कठोर पावले

दुसरीकडे, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या प्रकरणाची गंभीर दखल घेत 'व्हीएसआर' कंपनीच्या सर्व लेअर जेट विमानांच्या उड्डाणांवर केंद्र सरकारकडून बंदी घातली आहे. जोपर्यंत या संपूर्ण अपघाताची तांत्रिक चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही विमाने हवेत झेपावणार नाहीत.

रोहित पवारांकडून विमान कंपनी, डीजीसीएवर आरोप...

आमदार रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांत पत्रकार परिषदा घेऊन या अपघाताबाबत अनेक मुद्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. विमानांच्या देखभालीत (Maintenance) गंभीर त्रुटी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विमानाचे पायलट आणि कंपनीच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे.रोहित पवारांनी तांत्रिक मुद्द्यांसह विमान कंपनी आणि डीजीसीएवर प्रश्न उपस्थित केल्यानं हा केवळ अपघात आहे की एखादा मोठा घातपात, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar Plane Crash: रोहित पवारांनी पितळं उघडं पाडलं? डीजीसीए पाठोपाठ एकनाथ शिंदेंचा विमान कंपनीला मोठा दणका
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement