Diwali Shopping :1600 रुपयांचा ड्रेस फक्त 500 रुपयांत, दिवाळीसाठी करा मनसोक्त खरेदी, हे आहे लोकेशन

Last Updated:

सध्या मार्केटमध्ये दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळी म्हटलं की कपड्यांची खरेदी तर आलीच.

+
प्रत्येक

प्रत्येक ड्रेसवर 50% डिस्काउंट,हे ठिकाणं माहितेय का तुम्हाला

पुणे : येत्या 20 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होत आहे. रोषणाई, नवीन कपडे, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी या सगळ्या गोष्टींमुळे दिवाळीची वाट अगदी वर्षभर आतुरतेने पाहिली जाते. सध्या मार्केटमध्ये दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दिवाळी म्हटलं की कपड्यांची खरेदी तर आलीच. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणी कपड्यांवर आकर्षक सवलती आणि ऑफर्स सुरू झाल्या आहेत. आज आपण आकुर्डी येथील मार्केटमध्ये सुरू असलेल्या कपड्यांवरील ऑफर्सबद्दल जाणून घेणार आहोत.
पिंपरी-चिंचवड येथील आकुर्डी परिसरात सध्या दिवाळीच्या खरेदीला सुरुवात झाली असून, चिखली रोडवरील मार्केटमध्ये कपड्यांवर मोठ्या प्रमाणात सवलती आणि ऑफर्स सुरू आहेत. या मार्केटमध्ये महिलांसाठी, पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी सर्व प्रकारचे कपडे एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदारांकडून 40 ते 50 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे.
advertisement
येथील मार्केटमध्ये टी-शर्ट फक्त 100 रुपयांपासून सुरू होत असून, विविध डिझाईन आणि विविध कलरमध्ये उपलब्ध आहेत. महिलांसाठी कुर्ती 150 ते 180 रुपयांपर्यंत मिळत आहेत. तसेच 1600 ते 1700 रुपयांचे ड्रेस फक्त 500 ते 600 रुपयांत विक्रीस ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कमी किमतीत दर्जेदार कपडे खरेदी करण्याची उत्तम संधी ग्राहकांना मिळत आहे. या आकर्षक सवलतींमुळे आकुर्डी मार्केटमध्ये दिवाळीपूर्वी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali Shopping :1600 रुपयांचा ड्रेस फक्त 500 रुपयांत, दिवाळीसाठी करा मनसोक्त खरेदी, हे आहे लोकेशन
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement