हिवाळ्यात सुका मेवा महागला, गोडंबी अन् खोबऱ्याच्या दरात मोठी वाढ, काय आहेत भाव?

Last Updated:

मागील काही दिवसात राज्यात थंडीचा जोर वाढल्याचे पाहायला मिळाले. याचाच परिणाम सुक्या मेव्याच्या दरावर झाल्याचे पाहायला मिळत आहे.

+
News18

News18

नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : मागील काही दिवसात राज्यात थंडीचा जोर वाढल्याचे पाहायला मिळाले. याचाच परिणाम सुक्या मेव्याच्या दरावर झाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य ग्राहकांमधून सुक्या मेव्याला मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. यावर्षी सुरुवातीला सुक्या मेव्याचे दर स्थिर होते. मात्र, उत्पादन घटल्याने खोबरे, गोडंबी आणि काजूच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे तर सध्या बदामचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. पाहुयात सुक्या मेव्याच्या दारात किती वाढ झाली आहे आणि सध्या बाजारात कोणत्या सुक्या मेव्याला काय दर मिळतोय.
advertisement
हिवाळ्यात सुक्या मेव्याला मोठी मागणी असते. त्यातच आता थंडी वाढत चालल्याने सुक्या मेव्याच्या बाजारात सध्या नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. इतर देशातून येणाऱ्या काही पदार्थांच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे, तर दुसरीकडे केरळातून प्रामुख्याने जालन्यात येणाऱ्या खोबऱ्याचे दरही गतवर्षीच्या तुलनेत किलोने वाढले आहेत. उत्पादन घटल्यामुळे आवक कमी झाल्याचे विक्रेते असलम शेख यांनी सांगितले.
advertisement
गोडंबीच्या दरात यावर्षी सर्वाधिक वाढ दिसून येत आहे. गतवर्षी 500 ते 700 रुपये किलोने विकली जाणारी गोडंबी यावर्षी तब्बल 1100 ते 1300 रुपये किलोने विकली जात आहे. देशात येणारी खारीक प्रामुख्याने पाकिस्तानातून येते. खारीकचे दर 200 ते 300 रुपये किलो आहेत. गतवर्षी खारीक 180 रुपये किलोपासून उपलब्ध होती. त्यात 50 रुपये किलोमागे वाढ होत आहे. खोबऱ्याच्या दरात 120 ते 150 रुपयांवरून 240 रुपये किलोपर्यंत वाढ झाली आहे. काजूचे दर हे महिनाभरापूर्वी 600 रुपये प्रति किलो याप्रमाणे होते मात्र सध्या काजूला 1000 हजार रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळत असल्याचं विक्रेते असलम शेख यांनी सांगितले.
advertisement
ज्या सुक्या मेव्याची आवक कमी आहे. सध्या त्यांच्या दरात तेजी आहे, परंतु पुढील काही दिवसांत बदामाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या चांगले बदाम 720 रुपये किलोपासून उपलब्ध आहेत. पुढील काही दिवसांत यात किमान शंभर रुपये वाढू शकतात, असे सुका मेवा विक्रेत्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
हिवाळ्यात सुका मेवा महागला, गोडंबी अन् खोबऱ्याच्या दरात मोठी वाढ, काय आहेत भाव?
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement