Edamame Benefits: प्रोटिन्सचं पॉवर हाऊस आहे ‘ही’ भाजी, कॅन्सर सारखे गंभीर आजारही पळतील दूर

Last Updated:

Health benefits of Edamame in Marathi: घेवडा हा प्रथिनांचा खजिना आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. घेवड्यात प्रथिनांव्यतिरिक्त फायबर, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह, फोलेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखी महत्त्वपूर्ण खनिजं आढळून येतात. ज्यामुळे आरोग्याला विविध फायदे होऊन वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवता येतं.

प्रतिकात्मक फोटो : 
प्रोटिन्सचं पॉवर हाऊस आहे ‘ही’ भाजी, कॅन्सरही घाबरून पळेल दूर
प्रतिकात्मक फोटो : प्रोटिन्सचं पॉवर हाऊस आहे ‘ही’ भाजी, कॅन्सरही घाबरून पळेल दूर
मुंबई : घेवडा ही एक आरोग्यदायी भाजी आहे. घेवड्याचे दाणे हे सोयाबीनच्या आकाराचे मात्र रंगाने हिरवे असतात. त्यामुळे या भाजीला ग्रीन सोयाबीन किंवा हिरवं सोयाबीन असंही म्हणतात. ग्रामीण भाषेत ही भाजी वालपापडी या नावाने ओळखली जाते. घेवडा हा प्रथिनांचा खजिना आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. घेवड्यात प्रथिनांव्यतिरिक्त फायबर, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह, फोलेट, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखी महत्त्वपूर्ण खनिजं आढळून येतात. ज्यामुळे आरोग्याला विविध फायदे होऊन वेगवेगळ्या आजारांना दूर ठेवता येतं. घेवड्यात अँटिऑक्सिडंट्स देखील असतात ज्यामुळे शरीरातली जळजळ कमी होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते.शंभर ग्रॅम घेवड्यात जवळपास 11 ग्रॅम प्रोटीन्स असतात. यावरून त्यांच्या असलेल्या प्रथिनांच्या समृद्धीची कल्पना येईल. घेवड्यात असलेल्या पोटॅशियममुळे हृदविकारांचा धोका टाळता येतो. याशिवाय हिवाळ्यात होणाऱ्या सांधेदुखीच्या त्रासावर हिवाळ्यात घेवड्याची भाजी खाणं फायद्याचं ठरतं.

जाणून घेऊयात आरोग्यदायी घेवड्याचे विविध फायदे.

1) हृदयाचं आरोग्य सुधारतं :

घेवड्यात चांगल्या प्रमाणात पोटॅशियम आढळून येतं. ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होऊन उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो. पोटॅशियममुळे रक्तातल्या सोडियमचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची नियंत्रित राहून हृदयविकारांचा धोका कमी होतो.

2) डायबिटीस नियंत्रणात येतो :

घेवड्यात फायबर्स चांगल्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे खाल्लेलं अन्न सहज पचायला मदत होते. पचनक्रिया सुधारल्याने रक्तात साखर विरघळायला वेळ लागतो. त्यामुळे घेवड्याची भाजी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.डायबिटीस असलेल्या रूग्णांना घेवड्याची भाजी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
advertisement
Health benefits of Edamame in Marathi: प्रोटिन्सचं पॉवर हाऊस आहे ‘ही’ भाजी, कॅन्सरही घाबरून पळेल दूर

3) वजन कमी करण्यात फायदेशीर :

ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी घेवडा खूप फायदेशीर आहे. घेवड्यात भरपूर फायबर आणि प्रथिनं असतात. फायबरमुळे तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. प्रथिनांमुळे शरीराला ताकद मिळते. त्यामुळे कमी अन्न खाल्ल्यानेही शरीराला उर्जा मिळते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी घेवड्याची भाजी खाणं खूप फायदेशीर आहे.
advertisement

4) स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो :

घेवड्याची भाजी ही महिलांसाठी कोणत्या वरदानापेक्षा किंवा अमृतापेक्षा कमी नाहीये. जंकफूड, प्लॅस्टिकच्या अतिवापारामुळे गेल्या काही वर्षात कर्करोगाचं प्रमाण वाढलंय. कर्करोगाच्या रूग्णांच्या सरासरीचा विचार केला तर अनेक महिला स्तनाच्या कर्करोगाच्या शिकार होतात. कर्करोगासारख्या गंभीर आजारावर घेवडा गुणकारी आहे. घेवड्यात आयसोफ्लाव्होन असतात. ज्यामुळे इस्ट्रोजेनचं उत्पादन कमी व्हायला मदत होते. इस्ट्रोजेन हे कर्करोगाला कारणीभूत ठरतं.
advertisement

5) हाडं मजबूत होतात :

घेवड्यात प्रथिनांव्यतिरिक्त कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे हाडांची ठिसूळता कमी  होऊन हाडांची घनता वाढायला मदत होते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो. यामुळे ऑस्टिओपोरोसिस सारख्या आजारांचा धोका टळतो.
advertisement
घेवडा ही वर्षभर मिळणारी भाजी आहे. त्यामुळे ती केव्हाही खाणं फायद्याचं आहे. मात्र सांधेदुखीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी किमान हिवाळ्यात तरी घेवड्याची भाजी खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Edamame Benefits: प्रोटिन्सचं पॉवर हाऊस आहे ‘ही’ भाजी, कॅन्सर सारखे गंभीर आजारही पळतील दूर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement