आता नाशिकमध्ये घ्या शेगावच्या अन्नछत्र प्रसादालायचा अनुभव, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
हे फक्त एक हॉटेल नसून एक धार्मिक स्थळ आहे. ज्याची सुरुवात गजानन आंधळे यांनी केली आहे.
नाशिक : आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अशीही एक म्हण आहे 'अन्न हे पूर्णब्रह्म' तर हिच म्हण अस्तित्वात नाशिकच्या प्रसादालय हॉटेलने आणली आहे. हे फक्त एक हॉटेल नसून एक धार्मिक स्थळ आहे. ज्याची सुरुवात गजानन आंधळे यांनी केली आहे.
या हॉटेलला कोणीही आल्यावर त्याला शेगाव येथील सुप्रसिद्ध श्री गजानन महाराज मंदिर येथे साकारण्यात आलेल्या अन्नछत्र प्रसादालयामध्ये आल्यासारखा भास वाटत असतो. या हॉटेलमध्ये अन्नाला महाराजांच्या प्रसादाचा मान दिला जातो आणि तितकच पावित्र्य राखून ते बनवण्यात येत. अन्न हे देवाचा प्रसाद असल्याने या ठिकाणी जेवण करत असताना आपल्या पायातील पादत्राणे आपल्याला बाहेर काढावे लागत असल्याचे हॉटेलचे मालक गजानन आंधळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
कशी झाली प्रसादालयची सुरुवात?
गजानन आंधळे यांचा आधीपासून एक स्वतःचा मिसळचा ब्रँड आहे. परंतु त्यांना अजून एक महाराष्ट्रीयन थाळीचा स्वतःचा ब्रँड सुरू करण्याची कल्पना सुचली असता त्यांनी गजानन महाराजांच्या अन्नछत्र सारखे दालन सुरू केले. या ठिकाणी असलेली शांतता, भक्तिमय वातावरण आणि प्रसादालयाची चव नाशिककरांना घेता येईल. त्यामुळे त्यांनी हे हॉटेल सुरू केले आहे.
advertisement
यांच्या या हॉटेलमध्ये गेलो की आपल्याला आपल्या पायातील चपला, बूट बाहेर काढून आत जावे लागते. तसेच या ठिकाणी असलेले वेटर सुद्धा पारंपारिक कपड्यांमध्ये उभे राहून आपले स्वागत करत असतात. या ठिकाणी रोज सकाळी आणि संध्याकाळी महाराजांची आरती ही केली जात असते आणि त्याचा मान देखील पहिला ग्राहक याला दिला जात असतो. ज्या ठिकाणी येणारे सर्व ग्राहक हे माऊली रूपाने येत असल्याने त्यांची विचारपूस देखील तितक्याच प्रमाणे केली जात असते.
advertisement
तसेच यांच्याकडे सर्व महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ हे मिळत असतात. त्याचबरोबर आता उन्हाळा लागला असून आंब्याचा सीझन चालू असल्याने यांच्याकडे अमरास थाळी देखील ही फक्त 390 ला मिळत असते.
तसेच यांची हे प्रसादालय हे फक्त नाशिकमध्येच नाही तर मुंबई तसेच पुण्यात देखील सुरू झाले आहे. तुम्हाला देखील शेगाव येथील प्रसादालयाचा अनुभव घ्यायचा असल्यास नाशिक येथील मुंबई नाका येथील हॉटेल प्रसादालय येथे नक्की भेट द्या.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
April 15, 2025 2:34 PM IST