जालन्यातील घेवर आणि फिनीची संपूर्ण राज्याला भुरळ, मकर संक्रातीमध्ये असते विशेष महत्त्व...

Last Updated:

मकर संक्रांत जवळ येताच जालना शहरातील बडी सडक घेवर फिनेच्या दुकानांनी गजबजू लागते. नारंगी रंगाचे आकर्षक घेवर आणि पांढरी शुग्रफिनी रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या नागरिकांना आकर्षित करते.

+
News18

News18

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : मकर संक्रांत जवळ येताच जालना शहरातील बडी सडक घेवर फिनेच्या दुकानांनी गजबजू लागते. नारंगी रंगाचे आकर्षक घेवर आणि पांढरी शुग्रफिनी रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या नागरिकांना आकर्षित करते. मैदा साखर आणि तूप यापासून बनलेले घेवर तर मैदा आणि साखरेपासूनच तयार झालेली फिनी या दोन खाद्यपदार्थांना मकर संक्रांतीला विशेष मान असतो. मारवाडी समाजामध्ये ही दोन्ही खाद्यपदार्थ अतिशय लोकप्रिय आहेत. संक्रांतीला वाण म्हणून घेवर आणि फिनी देण्याची परंपरा आहे. लोकल 18 च्या प्रतिनिधीने घेवर आणि फिनीच्या विक्रेत्यांशी संवाद साधून याविषयी अधिक जाणून घेतलं.
advertisement
जालना शहरातील तिवारी कुटुंब मागील 10 वर्षांपासून घेवर आणि फिनीच्या व्यवसायात आहे. साधारणपणे संक्रांतीच्या महिनाभर आधीपासून ते बडी सडक इथे असलेल्या श्रीराम मंदिराजवळ स्टॉल लावून घेवर बनवण्याचे काम करतात. तर फिनीला हैदराबाद येथून मागवले जात. 300 रुपये प्रति किलो असा घेवर आणि फिनीचा दर आहे तर शुगर फ्री घेवर 350 रुपये प्रति किलो या दराने विक्री केले जाते. मकर संक्रांतीला भेट म्हणून महिला या दोन वस्तू आपल्या आप्तजनांना आणि सखींना देत असतात.
advertisement
या घेवर आणि फिनीला केवळ जालन्यातच नव्हे तर मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक अशा मोठ्या शहरांमधून देखील मोठी मागणी असते. जालन्यातून हे दोन्ही खाद्यपदार्थ राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये पाठवली जातात. मारवाडी समाजाबरोबरच इतर समाजातही या दोन पदार्थांचे चलन आता वाढत आहे. बडी सडक इथे घेवर आणि फिनी विक्रीचे जवळपास 50 दुकाने मकर संक्रांतीच्या आधी लागलेली असतात. यामधून प्रत्येक विक्रेत्याला केवळ महिनाभराच्या कालावधीत 50 हजारांपासून एक लाखांपर्यंत नफा मिळतो. जालन्याची ओळख असलेली घेवर तुम्ही देखील एकदा तरी नक्की ट्राय करायला हवे.
advertisement
10 वर्षांपासून घेवर आणि फिनीचे इथे दुकान आहे. याआधी माझा मुलगा या ठिकाणी दुकान लावायचा. त्याचे आजारपणात निधन झाल्याने आता मी या दुकानावर बसत आहे. घेवर आणि फिनीला संक्रांतीला विशेष महत्त्व असतं. वानासाठी महिला भगिनी घेवर घेण्याची खरेदी आवर्जून करतात. इथेच घेवर तयार केले जातात तर फिनी हैदराबाद इथून मागवली जाते. एक महिन्याच्या कालावधीमध्ये 50 ते 60 हजार रुपये निव्वळ नफा मिळतो, असं विक्रेते श्रीनिवास तिवारी यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
जालन्यातील घेवर आणि फिनीची संपूर्ण राज्याला भुरळ, मकर संक्रातीमध्ये असते विशेष महत्त्व...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement