चिकन आणि अंड्यांचे युनिक फ्युजन; ठाण्यात मिळतोय चक्क खिमा घोटाळा Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
ठाण्यात चिकन आणि अंड्यांपासून तयार केलेला चिवष्ट असा पदार्थ खिमा घोटाळा मिळत आहे. या खिमा घोटाळ्याचा खवव्ये आवडीने आस्वाद घेत आहेत.
ठाणे, 01 डिसेंबर : स्ट्रीटफूड पदार्थांमध्ये तोच नेहमीचा वडापाव, समोसा पाव, भजी खाऊन खवय्ये आता कंटाळले आहेत. त्यामुळे स्ट्रीटफूडमध्ये फक्त शाकाहारी पदार्थच नव्हे तर मांसाहारी पदार्थ आता ठीक ठिकाणी वेगळ्या प्रकारात विकण्यास सुरू झाले आहेत. सर्वात अफोर्डेबल मसाहारी पदार्थ म्हणजेच अंड्यांपासून तयार केलेले वेगवगळे चिवष्ट पदार्थ. हे चिवष्ट पदार्थ खवय्ये अगदी चवी-चिवणे खातात. ठाण्यातील एका फूड ट्रकवर चिकन आणि अंड्यांपासून तयार केलेला चिवष्ट असा पदार्थ खिमा घोटाळा मिळत आहे. या खिमा घोटाळ्याचा खवव्ये आवडीने आस्वाद घेत आहेत.
ठाण्याचे इंटरनेिट मॉल जवळील पिरसरात असलेल्या या फुड ट्रकचे नाव गुल्लू अंडेवाला असे आहे. या फूड ट्रकचे मालक वेद रवळेकर आहेत. सहा महिन्याचा कमी कालावधीत आपल्या चवीमुळे प्रिसद्ध झालेल्या ह्या खिमा घोटाळ्याला खवय्यांची येथे अधिक मागणी आहे.
advertisement
खिमा घोटाळा कसा तयार होतो?
नॉनव्हेज बरोबरच एगीटेरियन खवय्यांच्या पसंतीची ही खिमा घोटाळा डिश चिकन खिमा आणि अंड्यांचे एक युनिक फ्युजन आहे. अतिशय सोपी अशी असलेली डिश तुम्ही घरी देखील तयारी करू शकतात. सर्वप्रथम चिकनचा खिमा तयार करून घ्यावा. त्यानंतर कढईत थोडे तेल घेऊन त्यात थोडा तयार खिमा घ्यावा. चिकन खिमा मध्ये दोन अंडी फोडून टाकावीत. गॅस मध्यम आचेवर ठेवून त्या मिश्रणाला अगदी भुर्जीप्रमाणे एकत्र करून घ्यावे.
advertisement
मिश्रणाला आणखीन फ्लेवर येण्यासाठी त्यात वरून थोडे तेल घालून त्यात मीठ, हळद, तिखट घालून पुन्हा एकजीव करून घ्यावे. तयार खिमा घोटाळा कोथिंबीर टाकून प्लेटवर कांदा आणि गरम पावा बरोबर सर्व्ह करावे. अशा प्रकारे चिकन खिमा घोटाळा खाण्यासाठी तयार होतो. खिमा घोटाळ्याची किंमत 100 रुपये आहे, अशी माहिती वेद रवळेकर यांनी दिली आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
December 01, 2023 11:16 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
चिकन आणि अंड्यांचे युनिक फ्युजन; ठाण्यात मिळतोय चक्क खिमा घोटाळा Video