Famous Spices Mumbai: दादरमधील 50 वर्षे जुनं ठिकाण, घरगुती पद्धतीने बनवलेले मिळतात पारंपरिक मसाले, किंमतही स्वस्त
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
इथं मिळणारी सगळी पीठं, लोणचं, मसाले हे सगळं दुकान मालक स्वतः बनवतात आणि होलसेल म्हणजेच घाऊक दरात विकतात. त्यामुळे चव, शुद्धता आणि किंमत तिन्ही बाबतीत माधव बाग खास आहे.
मुंबई : मसाले हा स्वयंपाक घरातील महत्त्वाचा पदार्थ आहे. दादर परिसरात माधव बाग नावाचं एक 50 वर्षे जुनं मसाल्याचे स्थानिक लोकांचं आवडतं दुकान आहे. इथं मिळणारी सगळी पीठं, लोणचं, मसाले हे सगळं दुकान मालक स्वतः बनवतात आणि होलसेल म्हणजेच घाऊक दरात विकतात. त्यामुळे चव, शुद्धता आणि किंमत तिन्ही बाबतीत माधव बाग खास आहे.
या दुकानात मिळणारं ताजं दळलेलं पीठ, घरगुती मसाले, लोणची आणि उपवासासाठी खास साहित्य ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. खास शालेय डब्यांसाठी मूग डोसा 60 रुपये, मसाला आंबोली 50 रुपये, धिरडी पीठ 60 रुपये आणि पारंपरिक छुंदा 100 रुपये 200 ग्रॅम अशी विविध उत्पादने आहेत.
advertisement
तसेच खजूर लोणचं 200 रुपये 200 ग्रॅम, कारल्याची चटणी, जवस आणि खोबऱ्याच्या चटण्या प्रत्येकी 45 रुपये 100 ग्रॅम, खिचडी मसाला 40 रुपये 50 ग्रॅम, मिसळ आणि मालवणी मसाले, आणि गोडा मसालाही येथे उपलब्ध आहेत. पोहा पापड 80 रुपये, 25 नग, साबुदाणा चिकवडी, तांदळाचे पापड 80 रुपये 25 नग, सांडगी मिरची 50 रुपये, 50 ग्रॅम यांसारखी पारंपरिक उत्पादनेही ग्राहकांच्या पसंतीस उतरतात.
advertisement
माधव बाग हे केवळ खरेदीचं ठिकाण नाही, तर एका परंपरेचा भाग बनले आहे. जुन्या पिढीपासून ते आजच्या तरुणांपर्यंत प्रत्येकाची ही एक विश्वासार्ह निवड ठरली आहे. मोठ्या मॉल्स आणि ऑनलाइन विक्रीच्या जमान्यातही माधव बागनं आपली वेगळी ओळख टिकवून ठेवली आहे.
घाऊक दर आणि दर्जेदार उत्पादने यामुळे माधव बाग हे फक्त गृहवापरासाठीच नाही, तर छोट्या उद्योजक, हॉटेल्स, केटरिंग व्यवसाय आणि किराणा दुकानांसाठीही एक विश्वासार्ह आणि उत्तम पर्याय ठरतोय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 14, 2025 7:37 PM IST
मराठी बातम्या/Food/
Famous Spices Mumbai: दादरमधील 50 वर्षे जुनं ठिकाण, घरगुती पद्धतीने बनवलेले मिळतात पारंपरिक मसाले, किंमतही स्वस्त