Success Story: 8 वर्षांचा संघर्ष तरी सरकारी नोकरी नाही, तरुणाने सुरू केलं नाश्ता सेंटर, महिन्याला 5 लाखांची उलाढाल
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या शिवाजी आवटे या तरुणाने तब्बल 8 वर्षे पोलिस भरती, आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा दिली. मात्र, यश मिळाले नाही. सरकारी नोकरीत यश मिळाले नाही म्हणून त्यांनी स्वतःचे नाश्ता सेंटर सुरू केले.
छत्रपती संभाजीनगर: स्पर्धा परीक्षेची तयारी अनेक विद्यार्थी करतात. यामध्ये अनेकांना यश मिळत तर अनेकांना अपयश मिळत. अशीच कहाणी छत्रपती संभाजीनगरमधील तरुण शिवाजी आवटे याची आहे. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या शिवाजी आवटे या तरुणाने तब्बल 8 वर्षे पोलिस भरती, आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा दिली. मात्र, यश मिळाले नाही. सरकारी नोकरीत यश मिळाले नाही म्हणून त्यांनी स्वतःचे नाश्ता सेंटर सुरू केले. या नाश्ता सेंटरच्या माध्यमातून ते रोज 15 ते 20 हजार रुपयांची उलाढाल करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आवटे सध्या चांगली कमाई करतच आहेत. त्यासोबत त्यांनी अनेक जणांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.
8 वर्षांच्या अथक परिश्रमानंतरही सरकारी नोकरी न मिळाल्याने आवटे यांनी आपले नशीब उद्योजकतेत आजमावण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांनी क्लासेस असलेल्या ठिकाणीच नाश्ता सेंटर सुरू केले. या हेतूमागे त्यांची दूरदृष्टी होती, कारण या परिसरात स्पर्धा परीक्षा देणारे हजारो विद्यार्थी असतात.
त्यांच्या नाश्ता सेंटरमध्ये दही पोहे, समोसा राईस, मटकी, शिरा यासह अनेक पदार्थ या ठिकाणी मिळतात. या नाश्ता सेंटरच्या माध्यमातून 4 ते 5 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचे आवटे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले. त्यांच्या नाश्ता सेंटरमध्ये 11 कामगार आहेत. त्यांना देखील कामाच्या माध्यमातून चांगला रोजगार मिळाला आहे आणि ते समाधान व्यक्त करत आहेत.
advertisement
नाश्ता सेंटर व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवटे यांनी काही महत्त्वाचे मंत्र सांगितले आहेत. त्यांच्या मते या व्यवसायात येऊ पाहणाऱ्या तरुणांनी पदार्थांची क्वालिटी चांगली ठेवणे आणि ग्राहकांशी संवाद चांगला ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. एकदा ग्राहक आपल्या पदार्थांच्या चवीने आणि वागणुकीने आकर्षित झाले की ते वारंवार आपल्याकडेच येतात.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jun 13, 2025 1:36 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story: 8 वर्षांचा संघर्ष तरी सरकारी नोकरी नाही, तरुणाने सुरू केलं नाश्ता सेंटर, महिन्याला 5 लाखांची उलाढाल






