कोरोनात गेली नोकरी, इंजिनियर महिलेनं सुरू केला खास ब्रँड, आता लाखोंची कमाई, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कोरोना लॉकडाऊनच्या काळात कुंभार दाम्यत्याची नोकरी गेली. तेव्हा त्यांनी पौष्टिक बिस्कीट तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा: एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागं स्त्री असते, असं म्हटलं जातं. पण एखादा पुरुष स्त्रीच्या मागं खंबीरपणे उभा राहिला तर काय घडू शकतं याचा प्रत्यय साताऱ्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असणाऱ्या क्षेत्र माऊली येथील मेघा कुंभार यांची कोरोना काळात नोकरी गेली. तेव्हा पती धनंजय कुंभार यांनी पत्नीला पौष्टिक बिस्कीट बनवण्याच्या उद्योगासाठी साथ दिली. 14 प्रकारचे बिस्कीट बनवत 'दिव्यांक कुकीज' या ब्रँडच्या माध्यमातून कुंभार दाम्पत्य लाखोंची कमाई करत आहे.
advertisement
कसा सुरू झाला बिस्कीट ब्रँड?
कोरोना लॉकडाऊनच्या काळात कुंभार दाम्यत्याची नोकरी गेली. तेव्हा मेघा कुंभार यांनी पतीसह स्वत:चा व्यवसाय करण्याचा निर्धार केला. विविध 14 प्रकारच्या बिस्कीटांची निर्मिती सुरू केली. या पौष्टिक बिस्कीटांना मागणी वाढल्याने दिव्यांक कुकीज हा बिस्कीटांचा ब्रँड बनला आहे.
advertisement
पौष्टिक 14 प्रकारचे बिस्कीट
गव्हाचे बिस्किट, नाचणीचे बिस्किट, ओट्स बिस्किट, तृणधान्य बिस्कीट असे विविध प्रकारचे बिस्कीट बनवतात. तसेच नाचणी, ज्वारी, बाजरी, राजगिऱ्याचे, जीराचे, त्याचबरोबर डायट बिस्किटही बनवली जातात. ज्या व्यक्तींना शुगर बीपीचा त्रास होतो, जे लोक जास्त गोड खाऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठीही खास बिस्किटांची निर्मिती केली जाते. हे बिस्किट सेंद्रिय गूळ, तूप आणि गव्हापासून बनवले जातात. विशेष म्हणजे बिस्किटात एक टक्केही मैदा वापरला जात नाही, असे मेघा कुंभार सांगतात.
advertisement
बिस्कीट बनवण्याची पद्धत
नाचणीचे पीठ, गव्हाचे पीठ, सेंद्रिय गुळ,तूप, दूध, कस्टिंग पावडर, वेलची पावडर, मीठ आदी वस्तूंचा वापर करून उद्योजिका मेघा कुंभार पौष्टिक बिस्किट बनवत असतात. हे बिस्कीट पूर्णपणे सोनाली सातारा येथून न्यूट्रिशन व्हॅल्यू टेस्ट करून घेतले आहेत. गव्हाचे बिस्किट दीड महिना तर मिलेट कुकीज 4 महिने खाता येते.
advertisement
किती आहे किंमत?
14 प्रकाराचे बिस्कीट पूर्णपणे मैदा विरहित पौष्टिक आहेत. 100 ग्रॅम गव्हाच्या बिस्किटाला 30 रुपये दर, तर 100 ग्रॅम मिल्क कुकीजला 70 रुपये दर आहे. त्याचबरोबर 300 रुपये किलो ते 700 रुपये किलो पर्यंत या बिस्किटांची विक्री केली जाते. महिन्याला 150 ते 200 किलो बिस्किटांची विक्री करून तब्बल वार्षिक 6 लाख रुपये पर्यंत नफा ते मिळवत असतात. दर महिन्याला सर्व खर्च वगळता 40 हजार रुपये मिळतात, असे देखील उद्योजिका मेघा कुंभार यांनी सांगितलं आहे.
advertisement
कुठं होते विक्री?
view commentsकुंभार यांनी बनवलेल्या बिस्किटांची सातारा,पुणे, मुंबई, केरळ, गुजरात, गोवा, नागपूर, मडगाव या ठिकाणी विक्री केली जाते. त्याचबरोबर उमेद अभियान अंतर्गत सरस महोत्सव, गोवा सरस 2022, महालक्ष्मी सरस मुंबई 2023, उमेद अभियानांतर्गत जिल्हा अंतर्गत सर्व स्टॉल, त्याचबरोबर पुणे- मुंबई येथे मिलेट फेस्टिवल देखील मेगा कुंभार यांनी केले आहेत.
Location :
Satara,Satara,Maharashtra
First Published :
February 28, 2024 8:29 PM IST
मराठी बातम्या/Food/
कोरोनात गेली नोकरी, इंजिनियर महिलेनं सुरू केला खास ब्रँड, आता लाखोंची कमाई, Video

