लाल नाहीतर पांढरी स्ट्रॉबेरी, बाजारात मिळतोय तिप्पट दर; पाहा शेतकऱ्यानं कशी केली शेती video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीच यशस्वी प्रयोग करून दाखवत पांढऱ्या स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. विशेष म्हणजे पांढरी स्ट्रॉबेरी विकायला सुरुवात देखील केली आहे.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : स्ट्रॉबेरी म्हटलं की रंगाने लाल आणि चवीने थोडी आंबट हे आपल्याला माहिती आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर, भीलार, वाई भागात लाल स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जाते. मात्र, सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पांढऱ्या रंगाच्या स्ट्रॉबेरीच यशस्वी प्रयोग करून दाखवत पांढऱ्या स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. विशेष म्हणजे पांढरी स्ट्रॉबेरी विकायला सुरुवात देखील केली आहे.
advertisement
साताऱ्यातील वाई फुलेनगर येथील प्रयोगशील शेतकरी उमेश खामकर यांनी अर्ध्या एकरामध्ये चक्क पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. या स्ट्रॉबेरीची त्यांनी बाजारात विक्री देखील सुरु केली आहे. लवकरच या अनोख्या पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लवकरच ऑनलाईन विक्री देखील केली जाणार आहे. या स्ट्रॉबेरीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे याची किंमत 1000 पासून 1500 रुपये किलोपर्यंत आहे. या स्ट्रॉबेरीचे लाल स्ट्रॉबेरीच्या उत्पन्नापेक्षा सहा पट जास्त फायदा शेतकऱ्याला होणार आहे, असे देखील प्रगतशील शेतकरी उमेश खामकर यांनी सांगितलं आहे.
advertisement
1 एकर रेशीम शेतीतून तरुण शेतकरी झाला लखपती; नोकरी सोडून कसं मिळवलं यश?
पांढऱ्याशुभ्र रंगाच्या स्ट्रॉबेरीचे नाव फ्लोरिडा पर्ल असे आहे. भारतात या जातीची स्ट्रॉबेरी मी पहिल्यांदाच लावली आहे. यासाठी फ्लोरीडा युनिव्हर्सिटीतून रॉयल्टी राईट्स विकत घेतले आहे. यापुढे भारतात कोणालाही पांढऱ्या स्ट्रॉबेरीची शेती करायची असेल तर माझ्याकडून याचे हक्क विकत घ्यावे लागणार असल्याची माहिती शेतकरी उमेश खामकर यांनी दिली आहे.
Location :
Satara,Satara,Maharashtra
First Published :
February 28, 2024 10:09 AM IST
मराठी बातम्या/मनी/कृषी/
लाल नाहीतर पांढरी स्ट्रॉबेरी, बाजारात मिळतोय तिप्पट दर; पाहा शेतकऱ्यानं कशी केली शेती video