advertisement

Pune Food : 33 वर्षांपासून प्रसिद्ध, पुण्यात इथं मिळते लेमन टी, चव अशी की एकदा प्याल तर पुन्हा याल

Last Updated:

पुणे शहराची खाद्यसंस्कृती ही जगभरात नावाजली जाते. मिसळपाव, भेळ, वडापाव, मसाला दूध अशा अनेक पदार्थांबरोबरच येथे चहा आणि लेमन टीचीही स्वतंत्र अशी परंपरा आहे.

+
लेमन

लेमन टी 

पुणे : पुणे शहराची खाद्यसंस्कृती ही जगभरात नावाजली जाते. मिसळपाव, भेळ, वडापाव, मसाला दूध अशा अनेक पदार्थांबरोबरच येथे चहा आणि लेमन टीचीही स्वतंत्र अशी परंपरा आहे. एफसी रोडवर असलेले हिराबाई महाडिक लेमन टी हे ठिकाण आजही पुणेकरांच्या खास पसंतीस उतरले आहे. 1992 मध्ये सुरू झालेल्या या छोट्या व्यवसायाने आज तब्बल 33 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे.
या लेमन टी चा पाया तुकाराम महाडिक यांनी रचला. त्याकाळी एफसी रोड परिसरात विविध पेयांची दुकाने होती, मात्र काहीतरी वेगळे आणि हलके पेय मिळावे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून आणि ग्राहकांकडून वारंवार होत होती. हीच गरज लक्षात घेऊन त्यांनी लेमन टीची सुरुवात केली. सुरुवातीला एका कप लेमन टीची किंमत अवघी पाच रुपये होती. विद्यार्थ्यांसाठी ही किंमत सहज परवडणारी असल्याने लवकरच त्याला लोकप्रियता मिळाली.
advertisement
आज याची किंमत पंधरा रुपये झाली आहे, तरीही जुन्या ग्राहकांची ओढ अजूनही तशीच आहे. अनेक पुणेकर आजही म्हणतात की, एफसी रोडवर गेलो आणि हिराबाई महाडिकांचा लेमन टी घेतला नाही, तर भेट अपुरीच राहते. या ठिकाणाचा सुगंध, चव आणि वातावरण ग्राहकांना विशेष अनुभव देते.
advertisement
सुरेश धानवले सांगतात की, लेमन टीचा हा प्रवास फक्त व्यवसायापुरता नाही, तर पुण्याच्या खाद्यपरंपरेचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. दररोज शेकडो ग्राहक या ठिकाणी येतात. अनेक तरुणाई, ज्येष्ठ नागरिक, तसेच परदेशी पर्यटकही येथे चहा घेण्यासाठी थांबतात. लेमन टीची चव जरी साधी असली तरी त्यातली सातत्याची परंपरा ही खरी ताकद आहे.
advertisement
अनेक दशके उलटून गेली तरी रेसिपीमध्ये फारसा बदल केलेला नाही. त्याच ताजेपणाने आणि साधेपणाने बनवला जाणारा हा लेमन टी आजही अनेकांचा आवडता आहे.
एफसी रोडवरून जाणारे अनेक पुणेकर अजूनही खास वेळ काढून येथे येतात. गर्दीच्या शहरजीवनात थोडासा दिलासा देणारा हा कप लेमन टी म्हणजे पुणेकरांच्या आठवणींचा आणि सवयींचा भाग झाला आहे. त्यामुळेच हिराबाई महाडिक लेमन टी हे नाव पुण्याच्या खाद्यसंस्कृतीत आजही कायम आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Pune Food : 33 वर्षांपासून प्रसिद्ध, पुण्यात इथं मिळते लेमन टी, चव अशी की एकदा प्याल तर पुन्हा याल
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement