पुण्यात मिळतेय बाहुबली थाळी, 1 व्यक्ती खाऊच शकत नाही, पाहा काय आहे खास Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
ही थाळी एक व्यक्ती खाऊच शकत नाहीत. 20 इंच एवढा मोठा पराठा या थाळीमध्ये दिला जातो.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : पुण्याची खाद्य संस्कृती ही जगात नावाजली जाते. कारण पदार्थ देखील तसेच काहीसे वेगळे खायला मिळतात. पुण्यातील जेएम रोड वरील द हाऊस ऑफ पराठा याठिकाणी बाहुबली थाळी मिळत आहे. ही थाळी एक व्यक्ती खाऊच शकत नाहीत तर या थाळीला खाण्यासाठी 7 ते 8 लोक लागतात. 20 इंच एवढा मोठा पराठा या थाळीमध्ये दिला जातो तसेच वेगवेगळ्या भाज्या देखील या थाळीमध्ये मिळतात.
advertisement
कशी केली थाळीची सुरुवात?
द हाऊस ऑफ पराठाचे हॉटेलचे मालक दिनेश गिरी आहेत. या थाळीबद्दल माहिती देताना दिनेश गिरी यांनी सांगितले की, बाहुबली चित्रपटानंतर एक कल्पना डोक्यामध्ये होती. यामागचे कारण की फॅमिली जरी जेवणासाठी आली तरी ती एकत्रित बसत नाही. प्रत्येक जण एक वेगळी ऑर्डर देतो मग अशी कन्सेप्ट डोक्यात आली की आपण एखादी अशी थाळी बनवू शकतो. जेणेकरून पूर्ण फॅमिली एकत्र येऊन ती थाळी खातील. आणि जेव्हा फॅमिली ही थाळी खाण्यासाठी येते तेव्हा त्यांचामध्ये एक उत्साह पाहिला मिळतो.
advertisement
काय आहेत बाहुबली थाळीचे वैशिष्ट्य?
जगातील सर्वात मोठा पराठा ज्याला बाहुबली थाळी म्हणून ओळखतात. 20 ते 22 इंच इतका मोठा तो पराठा आहे. यामध्ये 7 प्रकारच्या भाज्या 2 डाळी, 2 प्रकारचा राईस कटप्पा बिर्याणी रायता यासोबत थाळीला स्टार्टर देखील येतो. पराठामध्ये आम्ही वेगळं स्टफिंग करतो. व्हेजस चिझ पनीर असं वेगळ्या पद्धतीने तयार केलं जात. या थाळीची किंमत 1699 रुपये आहे. 7 ते 8 लोक जण येऊन ही थाळी आरामात खाऊ शकतात. या ठिकाणी फॅमिली नाही तर कॉलेजची मुलं देखील खाण्यासाठी येतात. इतकंच न्हवे तर थाळी खाण्यासाठी बेंगलोर वरून एक जोडप पुण्यात आलं होत, अशी माहितीही दिनेश गिरी यांनी दिली आहे.
advertisement
पुण्यातील लोक नाही तर बाहेर राज्यातून देशातून देखील लोक इथे ही बाहुबली थाळी खाण्यासाठी येत असतात. तसच बाहुबली थाळी जर एकट्याने खाल्ली तर लाईफ टाईम साठी इथलं फुड हे फ्री आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पदार्थांनी तयार झालेली ही बाहुबली थाळी खायला तुम्ही नक्कीच जाऊ शकता.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
February 21, 2024 1:12 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
पुण्यात मिळतेय बाहुबली थाळी, 1 व्यक्ती खाऊच शकत नाही, पाहा काय आहे खास Video