मका आणि गव्हाचे एकत्रित मिश्रण; कधी खाल्ला आहे का राजस्थानमधील हा पापड? Video

Last Updated:

मुंबईत अनेक प्रकारचे खाद्यपदार्थही खायला मिळतात. घाटकोपरमधील खाऊ गल्लीमध्ये राजस्थानमधील खिचिया पापड खायला मिळत आहे. 

+
News18

News18

लतिका तेजाळे, प्रतिनिधी
 मुंबई : मुंबई एक असे शहर ज्यात विविध जाती जमातीचे लोक एकत्र राहत असलेले पाहायला मिळतात. या स्वप्न नगरीत महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातूनही अनेक लोक येऊन आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन करतात. यामुळेच मुंबईत अनेक प्रकारचे खाद्यपदार्थही खायला मिळतात. घाटकोपरमधील खाऊ गल्ली हे ठिकाण याचे एक उत्तम उदाहरण आहे. या ठिकाणी एखाद्या हॉटेलमध्ये मिळणार नाही तेवढे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य प्रकार उपलब्ध आहेत. याच खाऊ गल्लीमध्ये राजस्थानमधील खिचिया पापड खायला मिळत आहे. 
advertisement
काय आहे किंमत?
घाटकोपरच्या स्टेशन लगत असलेल्या नवदुर्गा पापड या स्टॉलवर खिचिया पापड मिळत आहे. राजस्थानी त्याचप्रमाणे मारवाडी नागरिकांचा अतिशय आवडीचा पदार्थ खिचिया पापड आहे. या खिचिया पापडला मसाला पापड असे ही म्हटले जाते. दुर्गा दिन मौर्य नावाचा तरुण राजस्थानचा राहणारा असून, गेली तीन वर्षांपासून खाऊ गल्लीत खिचिया पापड विकण्याचा व्यवसाय करत आहे. या ठिकाणी अस्सल राजस्थानी चवीचा आस्वाद खवय्यांना फक्त 20 रुपयांपासून घेता येईल.
advertisement
खिचिया पापड हा मका आणि गव्हाच्या एकत्रित मिश्रणापासून तयार केलेला एक पापड प्रकार आहे. त्या पापडला सर्वप्रथम भाजून घेतले जाते. चविष्ट मसाला पापड तयार करण्यासाठी भाजलेल्या पापडाला बटर लावून घ्यावी. त्याचे तुकडे करून त्यावर चाट मसाला घातले जाते. त्यावर काकडीचे बारीक काप पसरवावे. काकडीवर लसणाची चटणी आणि कोथिंबीर पुदिनाची चटणी टाकावी. त्यावर बारीक चिरलेले कांदा, टोमॅटो, गाजर आणि बीठ पसरवून अर्धा लिंबू पिळून घ्यावा. चवीसाठी काळ मीठ घालून त्याला शेव आणि कोथिंबीर कैरी घालून प्लेटमध्ये सर्व्ह करावे.
advertisement
गावरान हुरड्याचं थालीपीठ सर्वांनाच आवडतं, पण बनवायचं कसं? पाहा रेसिपी Video
कुठल्याही जेवणाची चव दुप्पट करण्यासाठी पापड एक महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे हाच राजस्थानी स्टाईल खिचिया पापड तुम्ही देखील घरी तयार करू शकता, अशी माहिती दुर्गा दिन मौर्य यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
मका आणि गव्हाचे एकत्रित मिश्रण; कधी खाल्ला आहे का राजस्थानमधील हा पापड? Video
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement