advertisement

Gudi Padwa 2024 Wishes : यंदाचा गुढीपाडवा सर्वांसाठी घेऊन येवो आनंद, या शब्दांनी साजरा करा दिवस

Last Updated:

Gudipadwa Wishes In Marathi : यावर्षी, 9 एप्रिलला गुढी पाडवा आहे, ज्याला मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे. महाराष्ट्रीयन लोक त्यांच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी शुभेच्छा देतात.

News18
News18
मुंबई : गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. देशात विशेषतः महाराष्ट्रात हा सण साजरा होतो. गुढीपाडवा सामान्यतः मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा होतो. चैत्र हा हिंदू पंचांगातला पहिला महिना आहे. यंदा गुढीपाडवा 9 एप्रिल रोजी साजरा होत आहे. या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. महाराष्ट्रीयन लोक त्यांच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी शुभेच्छा देतात.
नवे वर्ष, नवी सुरुवात… नव्या यशाची, नवी रूजवात…गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नव वर्षाची सुरूवात होवो न्यारी…सुख-समृद्धीने सजो आपली गुढी…हीच शुभेच्छा आहे आज माझ्या मनी
सण हर्षाचा, नव्या संकल्पांचा, इच्छा आकांक्षा, स्पप्नपूर्तींना बळ देणारा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
गुढी पाडव्याला आहेत अनेक कथा…गुढी म्हणजे विजयाची पताका…चैत्र महिन्यात सजली झाडं-झुडपं…म्हणूनच हिंदू धर्मात याला आहे नववर्ष म्हणून ओळख…गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्य व्हावे स्वप्नासारखे साकार, हाच विचार मनात घेऊन करूया नव्या वर्षाला सुरूवात.. नववर्षाभिनंदन.गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सोनेरी पहाट…उंच गुढीचा थाट, आनंदाची उधळण, अन् सुखाची बरसात…दिवस सोनेरी, नव्या वर्षाची सुरुवात…गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
advertisement
वसंताची पहाट घेऊन आली नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारु, आला चैत्र पाडवा…
आशेची पालवी, सुखाचा मोहोर…समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी…नववर्षाच्या शुभेच्या तुमच्यासाठी!
गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सर्वशक्तिमान देवाचे आशीर्वाद घेऊ आणि पुढील वर्ष सुंदर आणि आनंदी जावो अशी आशा करूया.
सोनेरी सूर्याची सोनरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनरी दिवस..सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा! गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
advertisement
एक नवीन आशा, एक नवीन सुरुवात, एक नवीन स्वप्न उलगडण्याची वाट पाहत आहे. हा गुढीपाडवा तुम्हाला न ऐकलेले लाखो आनंद घेऊन येवो.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Gudi Padwa 2024 Wishes : यंदाचा गुढीपाडवा सर्वांसाठी घेऊन येवो आनंद, या शब्दांनी साजरा करा दिवस
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement