Health Tips: खरचं लहान मुलांना काजळ लावल्यामुळे डोळे मोठे होतात का? एकदा हे वाचा

Last Updated:

आजी-आजोबा मुलांसाठी घरी काजळ तयार करतात किंवा मार्केटमध्ये जाऊन विकत घेतात आणि आपल्या लहान बाळांना लावायला सुरुवात करतात.

+
खरचं

खरचं लहान मुलांना काजळ लावल्यामुळे डोळे मोठे होतात का ?

छत्रपती संभाजीनगर : आपल्याकडे मुलं जन्मले की आजी-आजोबा मुलांसाठी घरी काजळ तयार करतात किंवा मार्केटमध्ये जाऊन विकत घेतात आणि आपल्या लहान बाळांना लावायला सुरुवात करतात. आपल्याकडे असं म्हणतात की लहान मुलांना काजळ घातलं की डोळे मोठे होतात पण हे खरंच आहे का? लहान मुलांच्या डोळ्यात आपण जर काजळ घातले तर मुलांचे डोळे मोठे होतात का? तर याविषयी आपल्याला नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर वैशाली उणे यांनी माहिती सांगितलेली आहे.
खरंतर आपण लहान मुलांना काजळ हे घालायला नाही पाहिजे कारण की त्यांचे डोळे अतिशय नाजूक असतात. आणि ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे की लहान मुलांच्या डोळ्यात काजळ घातल्यामुळे त्यांचे डोळे मोठे होतात. काजळ घातल्यामुळे डोळे मोठे होत नाहीत हे सर्व समज चुकीचे आहेत. डोळे मोठे होणार हे सर्वस्वी आई-वडिलांवरती असतं किंवा अनुवंशिक असते. जर तुमच्या आई-वडिलांचे डोळे मोठे असतील तरच तुमच्या डोळे मोठी होतात, असं डॉक्टर वैशाली उणे सांगतात. 
advertisement
काजळ घातलं किंवा इतर कुठली गोष्ट केली म्हणून डोळे मोठी होत नाहीत. आणि लहान मुलांच्या डोळ्यांना काजळ लावू नये. लहान मुलांचे डोळे अतिशय नाजूक असतात आणि आपण जर त्यांना काजळ लावलं तर त्यामुळे त्यांना इन्फेक्शन होण्याची देखील शक्यता असते. आपण काजळ लहान मुलांना बोटांना लावतो जेव्हा आपण त्यांना काजळ लावतो आपलं बोट जर त्यांच्या डोळ्यात चुकून दुसरीकडे कुठे लागले तर त्यामुळे त्यांना इजा होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.
advertisement
तसंच तुम्ही काजळ कोणतं वापरतात ते कशा कंडिशनमध्ये तयार केलेलं आहे हे देखील बघणं गरजेचं आहे. काजळ लावायचं असेल तर ते तुम्ही चांगलं काजळ लावावं किंवा तुम्ही घरी तयार केलेले काजळ हे लहान मुलांना लावावे. पण आम्ही सर्व नेत्ररोग तज्ज्ञ आई-वडिलांनाही सांगतो की तुम्ही तुमच्या लहान मुलांना काजळ लावू नये. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल काजळ लावलं म्हणून आपल्या बाळाला नजर लागत नाही तर तुम्ही त्यांच्या कानाच्या मागे काळा टीका लावू शकता पण डोळ्यांना काजळ लावू नये असा माझा सर्वांना सल्ला आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: खरचं लहान मुलांना काजळ लावल्यामुळे डोळे मोठे होतात का? एकदा हे वाचा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement