Egg Hair Mask : केसांच्या सौंदर्यासाठी वापरा हा मास्क, केस होतील दाट आणि मुलायम

Last Updated:

तब्येतीसाठी अंडी पोषक आहेतच पण केसांच्या आरोग्यासाठीही अंडी खूप महत्त्वाची आहेत. केसांचं सौंदर्य खुलवण्यासाठी खास Egg Hair Mask घरीच बनवता येतील. मऊ आणि जाड केसांसाठी अंड्यांसह आणखी काही जिन्नस वापरता येतात.

News18
News18
मुंबई : तब्येतीसाठी अंडी पोषक आहेतच पण केसांच्या आरोग्यासाठीही अंडी खूप महत्त्वाची आहेत. केसांचं सौंदर्य खुलवण्यासाठी खास Egg Hair Mask घरीच बनवता येतील. मऊ आणि जाड केसांसाठी अंड्यांसह आणखी काही जिन्नस वापरता येतात.
आहारात अंड्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश केला जातोच, अंड्याचे फायदे खूप असल्यानं अंड्यांना सुपरफूड म्हटलं जातं. अंड्यांच्या आरोग्यदायी फायद्यांमुळे ते केसांसाठीही फायदेशीर असतात. अंड्यांमध्ये असलेली  भरपूर प्रथिनं केसांसाठी पोषक घटक आहेत. पाहूयात Egg Hair Mask कसे बनवता येतील.
अंडी आणि ऑलिव्ह ऑइल -
अंडी आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करुन केसांना लावता येतं. हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळा. हे मिश्रण चमच्यानं चांगलं मिसळल्यानंतर डोक्याला लावा आणि अर्ध्या तासानंतर डोकं धुवा. केस मऊ होतात.
advertisement
अंडी आणि दही
हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका अंड्यामध्ये दही आणि थोडा मध मिसळून पेस्ट तयार करा. 40-50 मिनिटं केसांना लावा आणि नंतर धुवा. हा हेअर मास्क तुम्हाला ओल्या केसांवर लावायचा आहे.
अंडी आणि कोरफड
advertisement
हेअर मास्क बनवण्यासाठी एक चमचा कोरफड, एक चमचा अंड्यातील पिवळ बलक आणि एक चमचा लिंबू मिक्स करा. ते मिक्स करून केसांना लावा आणि तासाभरानंतर केस धुवा. यामुळे केस फुटण्याची समस्याही दूर होते.
अंडी आणि मेथीचे दाणे
3 चमचे मेथीदाणे रात्री भिजत ठेवा. हे दाणे बारीक करून पेस्ट बनवा आणि या पेस्टमध्ये एक अंडं फोडून टाका. हा हेअर मास्क 40-45 मिनिटांसाठी केसांवर लावता येतो. यामुळे केस मजबूत होतात.
advertisement
अंडी आणि केळी
केस जास्त कोरडे आणि निर्जीव दिसत असतील तर अंडी आणि केळी मिक्स करुन हेअर मास्क बनवा. या हेअर मास्कनं केसांचा कोरडेपणा कमी होऊ लागतो. यासाठी एक केळ कुस्करुन घ्या, आणि त्यात एका अंड्यासह थोडं खोबरेल तेल घाला आणि पेस्ट बनवा. हा हेअर मास्क केसांवर अर्धा तास ठेवा आणि नंतर धुवा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Egg Hair Mask : केसांच्या सौंदर्यासाठी वापरा हा मास्क, केस होतील दाट आणि मुलायम
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement