advertisement

Diet for Diabetes: हे 5 पदार्थ म्हणजे मधुमेहींसाठी विष! तुम्ही खाणं सोडलं का?

Last Updated:

Diet for Diabetes: सध्याच्या काळात मधुमेहाच्या रग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आपल्या आहारातून 5 पदार्थ टाळल्यास धोका कमी होऊ शकतो.

+
मधुमेहाचा

मधुमेहाचा धोका वाढलाय? हे 5 पदार्थ टाळल्यास होईल फायदा, तुम्हीही पथ्य पाळा!

मुंबई: सध्याच्या काळात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. दैनंदिन जीवनशैली आणि इतर काही कारणे मधुमेहासारखा आजार जडण्यास कारणीभूत ठरतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत काही बदल आणि योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे. दैनंदिन आहारात काही पथ्ये पाळल्यास मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. अशाच 5 अन्नपदार्थांबाबत जाणून घेऊ.
साखरयुक्त पदार्थ टाळाच
यामध्ये साखर आणि शुगर-युक्त पदार्थ म्हणजेच साखर, सोडा, मिठाई आणि केक यामध्ये जास्त शर्करा असते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी लवकर वाढते आणि त्यांनीच इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
तेलकट खाणं नको
तळलेले पदार्थ यामध्ये समोसा, पकोडी, फ्रेंच फ्राईस हे पदार्थ टाळावे या तळलेल्या पदार्थांमध्ये जास्त फॅट्स आणि कॅलोरीज असतात. यामुळे वजन वाढू शकते आणि शर्करेचा स्तर नियंत्रणात ठेवणे कठीण होऊ शकते.
advertisement
भात आणि भाकरी
पांढरे अन्नपदार्थ जसे की पांढरा भात आणि पांढरी भाकरी हे रक्तातील शर्करा लवकर वाढवतात. त्याऐवजी संपूर्ण धान्याचे पदार्थ (उदा. ओट्स, बाजरी) खाणे चांगले.
जंक फूड
तसेच प्रक्रियायुक्त अन्न म्हणजेच जंक फूड आणि इंस्टंट नूडल्स यामध्ये ट्रान्स फॅट्स आणि सोडियम जास्त असतात. यामुळे रक्तदाब आणि शर्करेची पातळी असंतुलित होऊ शकते. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळावे.
advertisement
तिखट आणि मसालेदार
तिखट मसालेदार पदार्थ खाणं ही टाळवं. जास्त तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पचनावर परिणाम होतो आणि इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, अति साखरयुक्त अन्नपदार्थांचे सेवन, मानसिक ताण आणि अनुवंशिकता ही मधुमेहाची प्रमुख कारणे आहेत. मधुमेह केवळ औषधांवर नियंत्रणात येणारी स्थिती नाही, तर ती संपूर्ण जीवनशैलीच्या बदलावर आधारित आहे. त्यामुळे तुमचा आहार तंतू, प्रोटीन आणि निरोगी फॅट्स असलेला असावा. ताज्या भाज्या, फळांचा समावेश करा. भाज्या आणि फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि खनिजे असतात, जे शरीराच्या एकूण कार्यक्षमतेस मदत करतात. यामुळे मधुमेहाचे नियंत्रण करणे सोपे होईल.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
Diet for Diabetes: हे 5 पदार्थ म्हणजे मधुमेहींसाठी विष! तुम्ही खाणं सोडलं का?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement