Health Tips: वजनाने त्रस्त आहात? घरगुती उपायांचा अवलंब केल्यास होईल फायदा
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
लठ्ठपणा हा निरोगी जीवनाचा मोठा शत्रू आहे. काही लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात पण त्यांचं वजन कमी होत नाही. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
बीड: लठ्ठपणा म्हणजेच वाढते वजन हा निरोगी जीवनाचा मोठा शत्रू आहे. लठ्ठपणामुळे डायबेटीस, हार्ट डिसिज, मेंदूचे आजार, डोळ्यांच्या समस्या इत्यादी आजार होऊ शकतात. वाढते वजन ही सध्याच्या काळातील एक सामान्य पण गंभीर समस्या बनली आहे. बदलती जीवनशैली, कमी शारीरिक हालचाल, वेळेवर न खाणे आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन या सगळ्यांचा परिणाम शरीरावर होतो. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी महागडे डाएट्स, सप्लिमेंट्स किंवा औषधांचा वापर करतात. पण, योग्य जीवनशैली आणि घरगुती उपायांमुळे देखील वजन नियंत्रित करता येते. लोकल 18 ने याबाबत बीड शहरातील डॉक्टर नागेश झांजुर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेतली.
योग्य आहार
डॉ. झांजुर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी उठून एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाकून प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे शरीर हलके वाटते आणि पचनाची क्रिया सुधारते. याशिवाय ग्रीन टी आणि मेथीदाण्याचे पाणीही उपयोगी ठरते. ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, ते चरबी जाळण्यास मदत करतात. मेथीदाणे पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि भूक नियंत्रणात राहते.
advertisement
वजन नियंत्रणासाठी आहारात काही बदल करणे उपयुक्त ठरते. जेवणाच्या वेळा पाळणे, गोड पदार्थ कमी खाणे, तेलकट पदार्थांचा मर्यादित वापर, भरपूर पाणी पिणे आणि ताज्या फळभाज्या खाणे, या गोष्टींचा अवलंब केल्यास शरीर तंदुरुस्त राहते. रात्रीचं जेवण झोपण्याच्या दोन तास आधी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. यामुळे पचन नीट होते आणि आपण खालेलं अन्न शरीरात चरबीच्या स्वरूपात साठत नाही.
advertisement
नियमित व्यायाम
आहाराबरोबरच नियमित व्यायाम करणेही तितकेच गरजेचे आहे. दररोज किमान 30 मिनिटे चालणे, योगासने किंवा सूर्यनमस्कारासारखे सोपे पण प्रभावी व्यायाम केल्याने शरीरातील फॅट बर्निंग जलद होते. डॉ. झांजुर्णी यांनी असंही सांगितलं की, वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाणे बंधनकारक नाही. घरच्या घरी नियमितपणे हलकासा व्यायामही खूप उपयुक्त ठरू शकतो. विशेषतः प्राणायामामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.
advertisement
डॉ. झांजुर्णी शेवटी सांगतात की, वजन कमी करण्यासाठी संयम, सातत्य आणि सकारात्मक मानसिकता अत्यंत गरजेची आहे. घरगुती उपाय हे खर्चिक नसतात. त्यात सातत्य ठेवल्यास त्याचे परिणाम दीर्घकालीन आणि आरोग्यवर्धक असतात. वजन नियंत्रित ठेवून अनेक आजारांपासून आपले संरक्षण करता येते.
view commentsLocation :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
August 07, 2025 8:19 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: वजनाने त्रस्त आहात? घरगुती उपायांचा अवलंब केल्यास होईल फायदा

