Agriculture News:....तर सरकारकडून शेतकऱ्यांना मिळते 7 लाख 50 हजारांची मदत, योजनेची संपूर्ण माहिती
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Agriculture News: वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान किंवा पशूंवर प्राणघातक हल्ला केला आणि त्यात नुकसान झाल्यास त्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्याची भरपाई शासनाकडून दिली जाते.
छत्रपती संभाजीनगर : वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान किंवा पशूंवर प्राणघातक हल्ला केला आणि त्यात नुकसान झाल्यास त्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्याची भरपाई शासनाकडून दिली जाते. तसेच वन्यप्राण्यांमुळे मानवी हानी किंवा अपंगत्व आल्यास महाराष्ट्र वन्यप्राण्यांमुळे झालेली हानी, नुकसान आणि इजा याकरता नुकसानभरपाई करणे अधिनियम 2023 आहे, हा अधिनियम 30 जानेवारी 2024 ला लागू झाला आहे. त्यानुसार वन्यप्राण्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी किंवा ठार झाल्यास शासनाकडून 25 लाख रुपये दिले जाते, यामुळे कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबीयांसाठी ही मोठा मदत शासनाकडून मिळत आहे असे छत्रपती संभाजीनगर वनपरिक्षेत्र अधिकारी सागर कुटे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात कर्ता पुरुष किंवा शेतकऱ्याला कायमस्वरूपी दिव्यांगत्व आल्यास 7 लाख 50 हजार रुपये दिले जातात तर गंभीर इजा झाल्यास 5 लाख रुपयांपर्यंत ही रक्कम दिली जात आहे. तसेच वन्यप्राण्यांमुळे पशुहानी गाय, म्हैस, बैल यांची जीवित हानी झाल्यास पशूंच्या बाजारकिमतीच्या 75 टक्के किंवा 70 हजार रुपये यापेक्षा जी कमी असेल तितकी रक्कम दिली जाते.
advertisement
वन्यप्राण्यांमुळे पीकनुकसान झाले असल्यास त्यासाठी महाराष्ट्र वनविभाग वनपरिक्षेत्र कार्यालयात अर्ज करावा लागतो, त्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते. सूचनेनुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यास वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी येऊन पंचनामे करतात. त्यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालयात उपक्रम सादर करतात.
advertisement
त्यानुसार नुकसानभरपाई किंमत ठरवली जाते. तसेच ते प्रकरण सहाय्यक वनसंरक्षक विभागीय कार्यालयात पाठवले जाते. तेथून फाइल मंजूर झाल्यास संबंधित शेतकऱ्याच्या नावाचा चेक येतो, नंतर तो चेक शेतकऱ्याला दिला जातो, असे देखील कुटे यांनी सांगितले आहे.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
July 08, 2025 6:35 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Agriculture News:....तर सरकारकडून शेतकऱ्यांना मिळते 7 लाख 50 हजारांची मदत, योजनेची संपूर्ण माहिती