advertisement

Winter Health News : हिवाळ्यात कमी पाणी पिताय? वेळीच व्हा सावध, नाहीतर हे आजार नाही सोडणार साथ

Last Updated:

हिवाळ्यात बरेच लोक कमी पाणी पितात. अर्थातच असे करू नये कारण आपल्या शरीरासाठी हायड्रेट राहणे खूप महत्त्वाचे आहे.

+
हिवाळ्यात

हिवाळ्यात कमी पाणी पिल्याने अनेक समस्या होऊ शकतात..

पुणे : उन्हाळ्यात आपल्याला तहान अधिक लागते आणि साहजिकच आपण अधिक पाणी पित असतो. मात्र हिवाळ्यात बरेच लोक कमी पाणी पितात. अर्थातच असे करू नये कारण आपल्या शरीरासाठी हायड्रेट राहणे खूप महत्त्वाचे आहे. उन्हाळा असो वा हिवाळा, पिण्याचे पाणी अतिशय महत्त्वाचे आहे. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट होते आणि हानिकारक पदार्थ शरीरातून निघून जातात. त्यामुळे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. कमी पाणी पिण्याने मेंदूचेही नुकसान होऊ शकते. याबद्दलची अधिक माहिती लोकल 18 शी बोलताना डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.
आपल्या शरीरात सुमारे 60 टक्के पाणी आहे आणि दररोज 2.5 लिटर पाणी शरीरातून बाहेर पडते. जेव्हा शरीरात 10 टक्के पाण्याची कमतरता असते तेव्हा तहान लागते. निरोगी राहण्यासाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पाणी पिणे महत्त्वाचे आहे. पाणी कधी, किती आणि कसे प्यावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीरातील डिहायड्रेशनचा धोका वाढतो. ज्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. अशा स्थितीत स्मरणशक्ती कमकुवत होण्याचा धोका असतो.
advertisement
डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले की, हिवाळ्यात ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो, ज्याची अनेक कारणे असू शकतात. त्यातील एक म्हणजे कमी पाणी पिणे. थंड वातावरणात लोकांना कमी तहान लागते. त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, डिहायड्रेट राहिल्यामुळे मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे पक्षाघाताचा धोका असतो. कमी पाणी पिल्याने किडनीवर गंभीर परिणाम होतो. याशिवाय किडनी स्टोन होण्याचा धोकाही वाढतो. किडनी व्यवस्थित काम करण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा किडणीला जास्त काम करावे लागते. त्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा ट्रॅकमध्ये जळजळ होण्याची तक्रार असते.
advertisement
हिवाळ्यात किती पाणी पिणे आवश्यक आहे?
शरीराला उन्हाळ्यात जितके पाण्याची आवश्यकता असते तितकेच हिवाळ्यातही पाण्याची आवश्यकता असते. आपल्या शरीराचा सुमारे 60% भाग पाण्याने बनलेला असतो, जो विषारी पदार्थ बाहेर काढण्यास, शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास आणि पचनास मदत करण्यास मदत करतो. हिवाळ्यात, श्वासोच्छ्वासाद्वारे, लघवीद्वारे आणि अगदी हलक्या घामाद्वारे पाणी बाहेर पडते. म्हणून, दररोज किमान 2 ते 2.5 लिटर पाणी पिणे महत्त्वाचे आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Winter Health News : हिवाळ्यात कमी पाणी पिताय? वेळीच व्हा सावध, नाहीतर हे आजार नाही सोडणार साथ
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement