मासिक पाळी ते वजन वाढ, अंबाडीची फुले महिलांसाठी वरदान, फायदे पाहाल तर अवाक् व्हाल!
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Ayurveda: अंबाडीची भाजीप्रमाणेच अंबाडीची फुले देखील अत्यंत आरोग्यदायी मानली जातात. महिलांसाठी ही फुले आरोग्याचा खजिनाच आहेत.
अमरावती: सध्या मार्केटमध्ये अंबाडीची फुले विकायला आहेत. ग्रामीण भागातील महिला शेतातून ही फुले आणतात आणि आहारात घेतात. पण, कोणालाच त्या फुलांमुळे होणारे फायदे माहीत नसतात. अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या या अंबाडीच्या फुलांचे महिलांच्या आरोग्यासाठी चमत्कारिक फायदे आहेत. मासिक पाळी ते वजन वाढ यांवर ही फुले अत्यंत लाभदायी आहेत. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
- अंबाडीची फुले आहारात घेतल्यास मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते. अंबाडीच्या फुलांत नैसर्गिक एस्ट्रोजेनिक गुणधर्म असतात. अनियमित पाळी, जास्त किंवा कमी होणारा रक्तस्राव यावरही ही फुले औषध म्हणून काम करतात. पोटदुखीमध्ये देखील आराम मिळतो.
- अंबाडीची फुले हिमोग्लोबिन वाढविण्यास देखील मदत करतात. यात लोह चांगल्या प्रमाणात असते. मासिक पाळीमध्ये होणाऱ्या रक्तस्रावामुळे लोह कमी झालेल्या महिलांसाठी हे उपयुक्त आहे.
- ही फुले पोटफुगी आणि गॅस कमी करण्यास देखील मदत करते. अंबाडीच्या फुलाचा चहा किंवा पाण्यात उकळून घेतल्यास पोट हलके राहते.
- अनेक महिलांना असणारे त्रास PCOS/PCOD मध्येही ही फुले उपाय म्हणून काम करतात. हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करणारे अँटिऑक्सिडंट्स यात असतात.
- महिलांमध्ये असणारी मोठी समस्या म्हणजे वजन वाढणे. वजन कमी करण्यासाठी देखील ही फुले कामात येतात. यात असलेले फायबर आणि नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्समुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. शरीरातील सूज कमी करते, ज्यामुळे मेटाबॉलिझम सुधारतो.
- प्रेग्नन्सीनंतरचे वजन कमी करण्यासही मदत करते. शारीरिक थकवा कमी होतो. रक्तशुद्धी आणि पचन देखील सुधारते. त्वचेसाठी देखील फायद्याचे आहे. व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असल्याने त्वचेचा ग्लो वाढविण्यास मदत होते. तसेच पिगमेंटेशन कमी होते. पिंपल्स, ऍक्नेची समस्या कमी होते.
- मासिक पाळीनंतर शरीरातील अपायकारक टॉक्सिन्स कमी करण्यासही मदत करते. गर्भाशयातील सूज, वेदना कमी करण्याची क्षमता देखील या अंबाडीच्या फुलांमध्ये आहे.
advertisement
फुले आहारात कशी घ्यावी?
अंबाडीच्या फुलांची चटणी बनवून तुम्ही आहारात घेऊ शकता. तसेच फुलाचा चहा, काढा, सरबत देखील बनवून घेऊ शकता. पण दिवसभरातून 1 वेळाच आहारात या फुलांचा समावेश करावा. तसेच औषधी म्हणून वापर करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही फुले आहारात घ्यावीत.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Nov 22, 2025 2:07 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
मासिक पाळी ते वजन वाढ, अंबाडीची फुले महिलांसाठी वरदान, फायदे पाहाल तर अवाक् व्हाल!







