कुठे समारंभात मृत्यू तर, कुठे जिममध्ये मृत्यू... सायलेंट किलर ठरतोय हार्ट अटॅक! तज्ज्ञ सांगतात की, "वेळीच ही लक्षणं..."
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
डॉक्टरांच्या मते, हृदयविकार येण्याआधी शरीर घाम येणे, घबराट, श्वास घेण्यास त्रास, गॅसचा त्रास यासारखे संकेत देते. मात्र, लोक याकडे दुर्लक्ष करतात. हृदयविकार...
Heart Attack Symptoms : हार्ट अटॅक इतका नाॅर्मल झालाय की, कधीही-कुठेही येऊ शकतो. बरं वयस्क लोकांनाच हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे, असं नाही तक लहान मुलांना आणि तरुण मुलांनाही तो येऊ शकतो. हे अनेक घटनांना आपल्याला दाखवून दिलंय. म्हणजेच लहानग्यांपासून थोरांमोठ्यांपर्यंत हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत तो काय येतो, त्यामागची कारणं काय, तो कसा ओळखायचा... असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. ते जाणून घेण्यासाठी आमच्या Local18 च्या प्रतिनिधीने मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक आणि हृदयविकार तज्ञ डॉ. एल. पी. सिंह यांच्याशी संवाद साधला.
यासंदर्भात बोलताना डाॅक्टर म्हणाले, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर अनेक संकेत देतं, पण लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात. यामध्ये जास्त घाम येणे, अस्वस्थता, धाप लागणे, गॅस होणे इत्यादींचा समावेश आहे. अशी लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
सायलेंट हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये फरक
डॉक्टरांच्या मते, सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे कार्डियाक अरेस्ट, ज्यामध्ये हृदयाचे ठोके अचानक थांबतात आणि रुग्ण दगावू शकतो. लग्नसोहळ्यासारख्या वातावरणात मोठा आवाज आणि प्रकाशामुळे हृदयाचे ठोके वाढू शकतात, ज्यामुळे जन्मजात हृदयविकाराच्या समस्यांमुळे कार्डियाक अरेस्ट येऊ शकतो.
advertisement
तरुण वयातही हृदयविकाराचा धोका
आजकाल तरुण लोकही हृदयविकार आणि कार्डियाक अरेस्टला बळी पडत आहेत. डॉक्टरांच्या मते, HOCM (हायपरट्रॉफिक ऑब्स्ट्रक्टिव्ह कार्डिओमायोपॅथी) सारख्या जन्मजात आजारांमुळे जास्त चालणे किंवा धावण्यामुळे अचानक मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत, 18 ते 21 वर्षांनंतर ECG आणि जनुकीय चाचणी करून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून संभाव्य धोके वेळेवर ओळखता येतील.
advertisement
बचाव कसा करायचा?
हृदयविकाराचा झटका टाळण्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची पातळी आणि तणाव नियंत्रित करणे. नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास ही गंभीर समस्या टाळता येते.
हे ही वाचा : तुम्हीही नैराश्यात आहात? मनात नको ते विचार येतात? तर रोज आवर्जुन करा 'हे' काम, शांत राहील मन!
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2025 12:06 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
कुठे समारंभात मृत्यू तर, कुठे जिममध्ये मृत्यू... सायलेंट किलर ठरतोय हार्ट अटॅक! तज्ज्ञ सांगतात की, "वेळीच ही लक्षणं..."









