उपाशीपोटी चहा प्यायल्याने कँसरचा धोका असतो? डॉक्टरांनीच केलं स्पष्ट
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
चहामध्ये कॅफिन असतं, ज्यामुळे अॅसिडिटी वाढते. शिवाय अन्नपचनाबाबत त्रासही होऊ शकतो. भूक कमी लागू शकते, परिणामी शरिराला आवश्यक ते पोषक तत्त्व मिळत नाहीत.
शिखा श्रेया, प्रतिनिधी
रांची : जास्त चहा आरोग्यासाठी धोक्याचा आहे, असं आहारतज्ज्ञ अनेकदा सांगतात. त्यामुळे काहीजण चहाला स्पर्शही करत नाहीत, तर काहीजणांच्या मात्र दिवसाची सुरूवातच चहाने होते. काहीजण म्हणतात, रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने कँसर होतो. हे खरंय का? याबाबत माहिती दिली आहे आरोग्यतज्ज्ञ डॉ. जेके मित्र यांनी.
डॉक्टरांनी सांगितलं, रिकाम्यापोटी चहा पिणं विविध आजारांचं कारण ठरू शकतं, हे खरं आहे. चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल्स गुणधर्म असतात, ज्याचे आरोग्याला फायदे होऊ शकतात. मात्र तेव्हाच जेव्हा चहा योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेतला जाईल. तसंच रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने कँसर होतो, याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही, असं डॉक्टर म्हणाले.
advertisement
दिवसाची सुरूवात काहीच न खाता केवळ चहाने केल्यास गॅस्ट्रिक अॅसिडिटी होऊ शकते, पोटात जळजळ होऊ शकते. चहामध्ये कॅफिन असतं, ज्यामुळे अॅसिडिटी वाढते. शिवाय अन्नपचनाबाबत त्रासही होऊ शकतो. भूक कमी लागू शकते, परिणामी शरिराला आवश्यक ते पोषक तत्त्व मिळत नाहीत.
advertisement
चहामध्ये डायूरेटिक प्रभाव असतो, ज्यामुळे शरिरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. म्हणून चहा प्यायचाच असेल, तर दिवसभरात पाणीही भरपूर प्यावं. शिवाय, नाश्त्यानंतर पिणं ही चहासाठी योग्य वेळ मानली जाते. त्यामुळे पोटात अॅसिडिटी होत नाही. शिवाय अन्नपचनही व्यवस्थित होतं. लक्षात घ्या, दिवसभरात जास्त चहा पिऊ नये. नाहीतर कॅफिनचे साइड इफेक्ट्स होऊ शकतात.
advertisement
हेही वाचा : International Tea Day : चहाबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहीतच नसतील, वाचा रंजक तथ्य..
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे हा चहा रिकाम्यापोटी पिऊ शकता, मात्र सोबत काहीतरी हलका नाश्ता केला तर उत्तम. दरम्यान, चहा आणि कँसरचा अद्याप काही संबंध आढळलेला नाही. त्यामुळे कँसर नाही, पण पोटासंबंधित इतर काही आजार होऊ नये म्हणून चहा योग्य वेळी आणि योग्य प्रमाणातच प्यावा.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
Ranchi,Jharkhand
First Published :
August 10, 2024 9:47 AM IST