Health Tips: ओट्स की मुसली, वजन घटवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? पाहा तुमच्या प्रश्नाचं उत्तर

Last Updated:
+
News18

News18

मुंबई: वजन कमी करण्यासाठी लाखो लोक विविध डाएट्स, सुपरफूड्स आणि नवनवीन उपाय शोधत असतात. त्यातच सकाळच्या नाश्त्याचा विषय आला, की दोनच पर्याय कायम चर्चेत असतात. ओट्स आणि मुसली. हे दोन्हीही आरोग्यदायी मानले जातात, पण वजन कमी करण्याच्या दृष्टीने कोण अधिक प्रभावी आहे? याबद्दलच आहार तज्ज्ञ स्नेहा परांजपे यांनी माहिती दिली आहे.
ओट्समध्ये कमी कॅलरीज, अधिक फायबर असतात तसेच ओट्स हे नैसर्गिक, कमी प्रक्रिया केलेले धान्य आहे. यामध्ये बिटा-ग्लुकन नावाचं फायबर असतं, जे भूक कमी करतं आणि पचन सुधारतंसाधे ओट्स दुधात किंवा पाण्यात शिजवून, फळं घालून खाल्ले तरी ते वजन कमी करण्यास खूप मदत करतातसर्वात महत्त्वाचं म्हणजे ओट्समध्ये साखर नसते, असं स्नेहा परांजपे सांगतात.
advertisement
तसेच मुसली ही ओट्स, ड्रायफ्रूट्स, बीजं आणि काहीवेळा मध किंवा साखरेचं मिश्रण असते. तिच्यात फायबर आणि पोषणमूल्य नक्कीच जास्त असतंपण पॅकेटबंद मुसलीमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असू शकतं. चवदार असली तरी वजन कमी करताना तिचा वापर विचारपूर्वक करावा लागतो. होममेड मुसली किंवा लो-शुगर मुसली वापरल्यास ती एक चांगला पर्याय ठरतो.
advertisement
तुम्ही वजन कमी करण्याच्या उद्देशाने नाश्ता शोधत असाल तर ओट्स हा अधिक प्रभावी पर्याय आहेत्यात साखर नाहीफायबर जास्त आहे आणि तो पोटभरही राहतो. म्युसली वापरायचीच असेल तर लेबल नीट वाचा अ‍ॅडेड शुगर टाळा आणि घरचीच मुसली खा, असं स्नेहा परांजपे सांगतात.
मराठी बातम्या/हेल्थ/
Health Tips: ओट्स की मुसली, वजन घटवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? पाहा तुमच्या प्रश्नाचं उत्तर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement